सातारा

Dr. Smita Jadhav | अराजकता माजवणाऱ्यांना धडा शिकवा : डॉ. येळगावकर

डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारार्थ शिक्षकांशी संवाद

पुढारी वृत्तसेवा

वडूज : ‘सातत्याने पराभव होत असल्याने काँग्रेसमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते युवकांची माथी भडकावून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रवृत्तींना मतपेटीतून धडा शिकवा,’ असे आवाहन माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी केले.

खटाव तालुक्यातील वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये भाजपच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. बंडा गोडसे, भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल माळी, वडूज शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गोविंद भंडारे, रेणू येळगावकर, माजी नगराध्यक्ष सुनील गोडसे, अनिल गोडसे, गणेश गोडसे, मनोज कुंभार, सतीश शेटे, नाना कांबळे, संभाजी गोडसे आणि नितीन कुंभार उपस्थित होते.

डॉ. येळगावकर म्हणाले, वडूज शिक्षण मंडळाशी आपले अनेक वर्षांपासून ऋणानुबंध आहेत. त्यामुळे संस्थेच्या अडचणींची आपल्याला जाणीव आहे. निवडणुकीच्या माध्यमातून शिक्षकांनी आपल्या बाजूने उभे राहिल्यास त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यास मदत होईल.

प्रा. बंडा गोडसे म्हणाले, समाजात शिक्षक वर्गाबद्दल मोठा विश्वास आहे. देशाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी शिक्षकांनी खंबीरपणे उभे राहावे. अनिल माळी यांनी वडूज शिक्षण मंडळ आणि शिक्षक बांधव शब्द दिल्यानंतर खंबीरपणे साथ देतात, असे सांगितले.

सतीश शेटे यांनी भाजपच्या सुरुवातीपासूनच्या वाटचालीचा तसेच जाधव परिवाराशी असलेल्या ऋणानुबंधांचा उल्लेख केला. प्रा. किरण कांबळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचलन केले. मुख्याध्यापिका भारती माने यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT