तासवडे टोलनाका : तासवडे एमआयडीसीमध्ये बारा तासात दहा स्फोट झाल्याने परिसरातील कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून शरीराची खाज होऊ लागल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्याच कंपनीत मोठा स्फोट झाला. त्यावेळी होमगार्ड दत्तात्रय खंडाईत व विकास खांडके यांनी त्या ठिकाणीपासून जीव वाचवण्यासाठी पळ काढला. ते सुमारे पाचशे फुटावर येऊन एका चारचाकी गाडीच्या खाली सुरक्षितरित्या थांबले. आणि त्याच वेळी कंपनीत रिॲक्टरचा प्रचंड मोठा स्फोट झाला.
दरम्यान, केमिकल कंपनीत सकाळी स्फोट झाल्यानंतर हवेत मोठ्या प्रमाणात धूर आण केमिकलचे कण पसरले होते. त्यामुळे त्या परिसरात अनेक जणांच्या डोळ्याला जळजळ आणि त्वचेला खाज जाणवत होती. स्फोटाच्या भीतीमुळे परिसरातील नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली आहे.