Bribe Case Pudhari
सातारा

Satara Bribe Case: लाचखोर तलाठी, कोतवाल ‘जाळ्यात’; राजाचे कुर्लेत कारवाई

बोजा नोंदीसाठी घेतले ३ हजार

पुढारी वृत्तसेवा

सातारा : राजाचे कुर्ले, ता. खटाव येथील तलाठी व कोतवाल या दोघांवरही लाचप्रकरणी गुन्‍हा दाखल झाला आहे. बोजा नोंदीसाठी ४ हजार रुपयांची मागणी करुन ३ हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने मंगळवारी ही कारवाई केली.

तलाठी विलास पांडूरंग नागरगोजे (वय ५१, सध्या रा. पुसेसावळी ता. खटाव मूळ रा. पाटोदा जि. लातूर) व कोतवाल जगन्‍नाथ नामदेव उमापे (वय ४९, रा. राजाचे कुर्ले) अशी दोन्‍ही संशयित आरोपींची नावे आहेत. यातील कोतवालाने तलाठ्यासाठी पैसे स्‍वीकारले आहेत.

या प्रकरणातील तक्रारदार यांना सहकार क्रेडीट संस्‍थेचे ५० हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. मात्र, तक्रारदार यांच्या मिळकतीवर बोजा आहे. त्‍यासंबंधी ग्रामपंचायत येथे बोजा नोंदीची प्रक्रिया करायची होती. संबंधित प्रक्रियेसाठी संशयित दोघांनी लाचेची मागणी केल्‍याने तक्रारदार यांनी सातारा एसीबीमध्ये तक्रार दिली. एसीबी विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी होत असल्‍याचे समोर आले.

लाचेची रक्‍कम मंगळवारी दि. ४ ऑगस्‍ट रोजी घेण्याचे ठरल्‍यानंतर एसीबीने सापळा लावला. त्‍यानुसार दोन्‍ही संशयितांना एसीबी विभागाने ताब्यात घेतले. औंध पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्‍हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT