Satara News: साताऱ्यात तालचक्र स्वर-तालांच्या साथीत नृत्य संगीताची गुढी Pudhari
सातारा

Satara News: साताऱ्यात तालचक्र स्वर-तालांच्या साथीत नृत्य संगीताची गुढी

दै. ‌‘पुढारी‌’ व तालचक्रच्यावतीने मंगळवारी आयोजन

पुढारी वृत्तसेवा

सातारा : भारतीय संस्कृतीतील महत्वाचा सण व हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा या मांगल्याच्या उत्सवाचे स्वागत करण्यासाठी ‌‘पुढारी‌’ पब्लिकेशन्स प्रा. लि. व तालचक्र यांच्या संयुक्त विद्यमाने व पुनित बालन ग्रुपच्या सहकार्याने भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्याच्या समृद्ध परंपरेला समर्पित असा चैत्रपालवी-तालचक्र हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सातारा व कोल्हापूर शहरांमध्ये सुर व तालांच्या साथीत कलेची गुढी उभारली जाणार आहे.

सातारा येथील सोहळ्यासाठी चंदुकाका सराफ ज्वेल्स हे ज्वेलरी पार्टनर आहेत. या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे दोन सत्रांमधून रसिकांना मिळणारा सांगितिक आनंद. पहिल्या सत्रात ताल, स्वर व नृत्याचा सुरेख संगम पहायला मिळेल. यामध्ये पद्मश्री विजय घाटे यांचा जादूई तबला, कथक नृत्यांगना शीतल कोलवलकर यांचे नृत्य, गायक सुरंजन खांडाळकर यांचे गायन आणि हार्मोनियमवर यशवंत थिटे यांची साथ लाभणार आहे.

दुसऱ्या सत्रात ख्यातनाम गायिका विदुषी देवकी पंडित यांची मंत्रमुग्ध करणारी गायन मैफल रंगणार आहे. त्यांना तबला साथ प्रशांत पांडव व हार्मोनियम साथ अभिनय रावांडे यांची लाभणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी हा कार्यक्रम रसिकांना एक अविस्मरणीय व प्रसन्न अनुभव देणारा ठरेल.

कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण

सातारा : मंगळवार दि.17 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता शाहू कला मंदिर, सातारा.

कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका : दै.‌‘पुढारी‌’ कार्यालय तसेच चंदुकाका सराफ ज्वेल्स, पोवई नाका, सातारा येथे मोफत प्रवेशिका दु. 12 ते 5 या वेळेत संपेपर्यंत उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क :

जितेंद्र शिंगटे : 8805007671

राहुल पवार : 8805007188

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT