सातारा

Satara Drowning Incident: विसर्जनावेळी विहिरीत पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

पुढारी वृत्तसेवा

भुईंज : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा सुरूर, (ता. वाई) येथे विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. आदित्य संतोष चव्हाण असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावावर शोककळा पसरली आहे.

आदित्य हा वाई येथील महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होता. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास तो वडील व चुलत्यांसमवेत गणपती विसर्जनासाठी गेला होता. विसर्जन करून विहिरीतून बाहेर येत असताना त्‍याचा पायऱ्यांवरून पाय घसरला आणि तो खोल विहिरीत कोसळला.

यानंतर वडील व चुलत्यांनी प्रसंगावधान राखत आदित्यला वाचवण्यासाठी विहिरीत उड्या घेतल्या. मात्र, विहीर खोल असल्याने त्याचा ठावठिकाणा लागला नाही. घटनेची माहिती मिळताच सुरूरमधील तरुणांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी विहिरीत शोधमोहीम सुरू केली. पाऊण तासाच्या प्रयत्नांनंतर आदित्यला विहिरीबाहेर काढले. यानंतर जिल्‍हा रुग्‍णालयात हलवले; मात्र उपचारापूर्वीच त्‍याचा मृत्‍यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT