girl death pudhari photo
सातारा

Satara Student Death: वसतिगृहाच्‍या तिसर्‍या मजल्‍यावरून पडून साताऱ्यात विद्यार्थिनीचा मृत्‍यू

आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याच्या तक्रारीनंतर विद्यार्थिनींची चौकशी सुरू होती

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा शहरातील यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून १९ वर्षीय विद्यार्थिनीचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. श्रुती बिरामणे (रा. महाबळेश्वर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

श्रुती ही महाविद्यालयात फूड टेक्नॉलॉजीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. ती महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात राहत होती. वसतिगृहातील बाथरूममध्ये आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याची तक्रार झाल्यानंतर वसतिगृह समितीकडून विद्यार्थिनींची चौकशी सुरू होती. याबाबत विद्यार्थिनींच्या पालकांना बोलावण्यात येणार होते.

याचदरम्यान श्रुती नजर चुकवून बाथरूमला जात असल्याचे सांगून वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावर गेली. त्यानंतर ती खाली पडल्याचे समोर आले. तिला उपचारासाठी नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. बाथरूममधील आक्षेपार्ह मजकुरावरून वसतिगृह व्यवस्थापनाची चौकशी सुरू असतानाच ही घटना घडल्याने महाविद्यालयीन परिसरात खळबळ उडाली. विद्यार्थिनीने नेमक्या कोणत्या कारणामुळे हे पाऊल उचलले, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT