ST Bus Pudhari
सातारा

Satara ST buses: उन्हाळी हंगामासाठी सातारा विभागातून एसटीच्या जादा फेऱ्या

सातारा-स्वारगेट मार्गावर दर 15 मिनिटाला बसेस धावणार

पुढारी वृत्तसेवा

सातारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील 11 आगारामधून उन्हाळी गर्दीच्या पार्श्वभूमीवर जादा फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. या जादा बसेसचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी केले आहे. दरम्यान, दर 15 मिनिटाला सातारा- स्वारगेट मार्गावर जादा बस सोडण्यात येणार आहे.

उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत सुमारे 15 जूनपर्यंत जादा बसेस विविध मार्गावर धावणार आहेत. सातारा आगारातून जामखेड, मुंबई सेंट्रल, कोल्हापूर, स्वारगेट, कराड आगारातून मुंबई सेंट्रल, पंढरपूर बीड, चिपळूण, आदमापूर, अक्कलकोट, विजापूर, लातूर, कोरेगाव आगारातून सोलापूर, कोल्हापूर, स्वारगेट, फलटण आगारातून त्र्यंबकेश्वर, परळ, अहिल्यानगर, शिर्डी, जोतिबा, स्वारगेट, वाई आगारातून अलिबाग, बार्शी, पाटण आगारातून सोलापूर, दहिवडी आगारातून परेल, शिर्डी, धाराशिव, इंदापूर, स्वारगेट, पुणे, महाबळेश्वर आगारातून कवठे महांकाळ, महाड-मुंबई, वाई-मुंबई, मेढा आगारातून मुंबई सेंट्रल, कुर्ला नेहरुनगर, ठाणे, जत, सोलापूर, स्वारगेट, पारगाव-खंडाळा आगारातून बीड, सातारा-परेल, स्वारगेट-पंढरपूर, वडूज आगारातून ठाणे, गणपतीपुळे, सातारा-बेळगाव, पुणे, वडूज-रहिमतपूर-परळ, निमसोड-परळ आदी लांब पल्ल्याच्या मार्गावर जादा बसेस धावणार आहेत.

जादा फेऱ्यांमुळे उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची सोय होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी जादा फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ज्योती गायकवाड यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT