Satara Crime: चाकूने हाताची नस कापत युवकाचा स्‍टंट 
सातारा

Satara Crime: चाकूने हाताची नस कापत युवकाचा स्‍टंट

सातारा एसटी स्टँडमध्ये थरार; घटनेचा व्‍हिडीओ व्‍हायरल

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शुक्रवारी भरदुपारी एका युवकाने हातात धारदार चाकू घेऊन स्वतःच्या डाव्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. युवकाच्या स्‍टंटबाजीने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. रक्ताने माखलेल्या अवस्थेत हा युवक बसस्थानक परिसरात फिरत राहिल्‍याने त्‍याचा व्‍हिडीओ व्‍हायरल झाला.

एसटी स्टँडमध्ये युवकाने त्‍याच्याकडील चाकूने हाताची नस कापून घेतली. युवकाच्या हातात चाकू असल्याने त्याला मदत करण्यासाठी पुढे जाणारेही घाबरत होते. काही नागरिकांनी धाडस दाखवत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो युवक नागरिकांपासून दूर पळत होता. एसटी स्टँड, स्‍टेडियम रोड, राधिका रोड अशी दौड त्‍या युवकाची सुरू होती. याचदरम्‍यान, येणा-जाणारे त्‍याचा व्‍हिडीओ करत होते. अखेर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला ताब्यात घेऊन त्याच्या हातातील धारदार चाकू बाजूला करण्यात आला.

या सर्व थरारक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. युवकाला शांत करत त्‍याला रक्तबंबाळ अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या युवकाने नेमक्या कोणत्या कारणातून स्वतःच्या हाताची नस कापून घेतली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मानसिक त्रासातून हा टोकाचा निर्णय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT