सातारा: सृष्टी बिरामणे मृत्यूप्रकरणी पहिली अटक केलेल्या जयश्री जकाते यांना सातारा जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. कमिटी नेमकी किती जणांची होती? त्यात कोण कोण होते? हे पोलिस तपासत असल्याने कमिटी गॅसवर गेली आहे. दरम्यान, इतर संशयितांचा शोध सुरुच आहे.
वायसी कॉलेजच्या होस्टेलमधील तिसर्या मजल्यावरुन सृष्टी बिरामणे (वय १९) या युवतीने २ सप्टेंबर रोजी उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेनंतर गेल्या पाच दिवसात विद्यार्थी संघटनेने आंदोलने केली. दुसरीकडे कॉलेजच्यावतीने पत्रकार परिषद झाली. एकामागून एक घडामोडी घडत असताना सृष्टीच्या वडीलांनी मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी होस्टेल रेक्टर, प्राचार्य व कमिटी सदस्यांविरुध्द सातारा शहर पोलिस गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी रेक्टर जकाते यांना रविवारी अटक केली.
रेक्टर जकाते यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. बचाव व सरकार पक्षाच्यावतीने न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. दोन्ही युक्तिवाद ऐकून न्यायाधिशांनी जकाते यांना १ दिवसाची पोलिस कोठडी दिली. दरम्यान, गुन्हा असल्याप्रमाणे पोलिस इतर संशयितांचाही शोध घेत आहेत.