भरधाव ट्रक देऊर बसस्थानकात घुसला 
सातारा

Satara Accident : भरधाव ट्रक देऊर बसस्थानकात घुसला

उपहारगृह उद्‌ध्वस्त : दैव बलवत्तर म्‍हणून मुलगा वाचला

पुढारी वृत्तसेवा

पिंपोडे बुद्रुक : सातारा-लोणंद मार्गावर सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला. लोणंद बाजूकडून साताऱ्याच्या दिशेने जाणारा एक भरधाव ट्रक थेट देऊर येथील एस. टी. बसस्थानकात शिरला. ट्रकच्या धडकेत बसस्थानकासोबत उपहारगृहाचे (कॅन्टीन) नुकसान झाले आहे. दैव बलवत्त म्हणून उपहारगृहात असलेला मुलगा वेळेवर सावध झाल्याने वाचला. मात्र, उपाहारगृह पूर्ण उध्वस्त झाले.

सातारा ते लोणंद रस्त्यावरील देऊर ता . कोरेगाव येथील बसस्थानक व त्यासोबत असलेल्या उपहारगृहात सोमवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास भरधाव ट्रक जाऊन धडकला. देऊर येथील सुभाष मांढरे हे येथील उपाहारगृह चालवतात. त्यांचा मुलगा आर्यन पहाटे उपहारगृह सुरू करण्यासाठी गेला. त्याने दरवाजा उघडला साफसफाई करून झाल्यावर काही वेळातच ट्रक भरधाव वेगाने उपहारगृहात घुसला. आर्यनला काय करावे हे सुचले नाही त्‍यामुळे तो तेथील किचन ओट्यावर उभा राहिला. उभा असलेल्या आर्यन पासून केवळ एक ते दीड फूट अंतरावर ट्रक थांबला होता. भीतीने गाळण उडालेला आर्यन उभ्या असलेल्या ट्रकच्या खालून बाहेर आला. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आर्यन या अपघातातून बचावला. ट्रकच्या धडकेत उपहारहागृहासोबत बसस्थानक सुद्धा अर्धे तुटून पडले. दरम्यान समोरून येणाऱ्या कार चालकाच्या चुकीच्या निर्देशामुळे ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT