Fraud Case file photo
सातारा

Satara fraud case: सहा जणांना 59 लाखांचा चुना

पंचतारांकित हॉटेलमधील रुम भाड्याने घेवून त्याद्वारे आर्थिक लाभ मिळवून देतो, असे सांगून साताऱ्यातील सहा जणांना एकाने 59 लाख रुपयांचा चुना लावला

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पंचतारांकित हॉटेलमधील रुम भाड्याने घेवून त्याद्वारे आर्थिक लाभ मिळवून देतो, असे सांगून साताऱ्यातील सहा जणांना एकाने 59 लाख रुपयांचा चुना लावला आहे. याप्रकरणी द ग्रेट इंडियन कॅरव्हॅन नावाच्या कंपनीच्या संशयितावर गुन्हा दाखल झाला आहे.

नरसिंहाचार रंगनाथाचार माधवाचार याच्याविरुद्ध बिंदूमाधव वसंतराव कुलकर्णी (वय 67, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना 2022 पासून वेळोवेळी घडली आहे. टूर्सच्या माध्यमातून संशयिताची तक्रारदार यांच्यासोबत ओळख झाली होती. संशयिताने आर्थिक लाभ देण्याचे आश्वासन देवून पैसे गुंतवण्यास सांगितले. तक्रारदार यांच्याप्रमाणेच इतरांनी पैसे गुंतवले. मात्र मूळ रक्कम व लाभ कोणताही न देता फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT