शिरवळमध्ये पिस्तूल जप्त; युवकाला अटक 
सातारा

Satara Crime : शिरवळमध्ये पिस्तूल जप्त; युवकाला अटक

शिरवळ पोलिसात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

शिरवळ : सातारा जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिरवळ पोलिसांनी एका इसमाकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. या प्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

शिरवळ पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती बेकायदेशीररीत्या देशी बनावटीचे पिस्तूल स्वतःजवळ बाळगून आहे. त्यानुसार शिरवळ पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवली. धनगरवाडी (ता. खंडाळा) येथील तेजस राजेंद्र मोटे (वय 20) यास ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास 12 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलिस ठाण्याच्या पथकाने केली. पुढील तपास शिरवळ पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT