St Bus  (source- MSRTC)
सातारा

Shikhar Shinganapur yatra: शिखर शिंगणापूर यात्रेसाठी सातारा आगारात 88 जादा बसेस

शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या चैत्री यात्रेसाठी एसटी महामंडळाचा सातारा विभाग सज्ज झाला आहे

पुढारी वृत्तसेवा

सातारा: शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या चैत्री यात्रेसाठी एसटी महामंडळाचा सातारा विभाग सज्ज झाला आहे. शिंगणापूर यात्रा दि. 28 ते 31 मार्च अखेर होत आहे. रविवार दि. 29 मार्च हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. त्यामुळे यात्रा कालावधीत भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी महामंडळाच्या सातारा विभागामार्फत 88 जादा बसेस विविध मार्गावर सोडण्यात येणार आहेत.

शिंगणापूर येथे यात्रेसाठी दोन ठिकाणी यात्रा शेड करण्यात आले आहेत. दहिवडी पॉईंट, कोथळे चौक येथे दहिवडी, कराड, सातारा फलटण व पुण्याकडे जाणाऱ्या 26 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तर मार्डी पाईंट येथील यात्रा शेडवर सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, कोरेगाव, दहिवडी, मेढा, वडूज आगाराच्या 62 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

यात्रेसाठी सातारा 7, कराड 8, कोरेगाव 5, फलटण 15, वाई 6, पाटण 5, दहिवडी 18, महाबळेश्वर 3, मेढा 6, पारगाव खंडाळा 3, वडूज 12 अशा मिळून 88 बसेस विविध मार्गावर सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी दिली. तसेच यात्रा काळात शिंगणापूर ते पंढरपूर अशी प्रवासी गर्दी असते. त्यासाठी शिंगणापूर येथून पंढरपूरसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT