सातारा : साताऱ्यातील मौती चौक ते शनिवार पेठ परिसरात भर दुपारी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालक व नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
मौती चौक ते शनिवार पेठ या मार्गावर वाहनांच्या मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या ठिकाणी चौक असल्याने चारही बाजूने वाहने मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यातच शनिवार पेठेतून मोती चौकाकडे जाण्यासाठी नो एन्ट्री आहे तरीही वाहनचालक वाहने नेत असतात. या ठिकाणी वाहतूक पोलिस उभे असल्यासे नो एन्ट्रीतून वाहने जात नाहीत.
मात्र वाहतूक पोलिस बाजूला गेले की वाहनचालक शिस्तीचे पालन करत नाहीत. त्यामुळेच दुपारी शनिवार पेठ परिसरात वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे परिसरात ट्रॉफीक चांगलेच जॉम झाले होते. वाहनांच्या दोन्ही बाजूला रांगा लागल्या होत्या. त्यातच या ठिकाणी भर रस्त्यात दोन्ही बाजूला वाहने व विक्रेत्यांच्या हातगाड्या असल्याने आणखीनच वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे पोलिस व पालिका प्रशासनाने येथील विक्रेत्यांना समज द्यावी, अन्यथा कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.