satara 
सातारा

Satara|सातत्याच्या राजकारणात देसाईंचा डाव भारी

पाटणकरांवर आत्मपरिक्षण करण्याची वेळ; शंभूराज देसाईंचे नेतृत्व, यशराज देसाईंचा गनिमी कावा यशस्वी !

पुढारी वृत्तसेवा

सणयूर : तुषार देशमुख

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नुकतीच पार पडलेली निवडणूक म्हणजे पाटण तालुक्याच्या राजकारणातील केवळ सत्तासंघर्ष नव्हे, तर दोन वेगवेगळ्या राजकीय कार्यपद्धर्तीचा झालेला मुकाबला होता. या निवडणुकीने एक गोष्ट ठळकपणे अधोरेखित केली, ती म्हणजे राजकारणात केवळ निवडणुकीच्या तोंडावर दारुगोळा गोळा करून घालत नाही, तर वर्षांचे वाराही महिने कार्यकत्यांच्या पाठीशी उभे राहावे लागते.

निवडणूक आली की मोर्चेबांधणी आणि निकाल लागला की पुन्हा शांतता, अशी कार्यपद्धती फार काळ टिकत नाही. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारा, कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा आणि सातत्याने संपर्कात राहणारा नेता हाच राजकारणात आपली पकड मजबूत ठेवतो. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत देसाई गटाने हेच सूत्र प्रत्यक्षात उतरवले, तर पाटणकर गटाला आपल्या राजकीय कार्यपद्धतीचा फेरविचार करण्याची वेळ आली.

पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर राज्याच्या मंत्रिमंडळातील जबाबदारीबरोबरच संपूर्ण जिल्ह्याची धुरा आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून राज्याच्या राजकारणात त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. मंत्रालयातील कामकाज, जिल्हाचा विकास आणि पाटण मतदारसंघातील जनतेचे प्रश्न अशा तीन आघाडयांवर त्यांची घोडदौड सुरू आहे. मात्र, या सगळ्या व्यापातही त्यांनी पाटणमधील अनसंपर्काची नाळ तुटु दिलेली नाही. मंत्रालय ते सातारा पालकमंत्री आणि सातारा ते पाटण मतदारसंघ असा त्यांच्या कामाचा धड़ाका कायम आहे. राजकारणात पद मोठे झाले की कार्यकत्यांपासून अंतर वाढते, अशी अनेक उदाहरणे असताना शंभूराज देसाई यांनी कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक टिकवून ठेवली आहे.

या नेतृत्वाला प्रत्यक्ष मैदानात साथ मिळते ती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई आणि मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांची शंभूराज देसाई राज्य आणि जिल्ह्याच्या कामकाजात व्यस्त असताना यशराज देसाई कारखाना स्थळापर चोवीस तास कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी उफनब्धा असतात. दुसरीकडे रचिराज देसाई दौलतनगर येथे कार्यकत्यांच्या अडीअडचणी जाणून घेतात. म्हणजेच देसाई परिवाराची राजकीय यंत्रणा केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून तालुक्याच्या कानाकोपन्यात कार्यरत असल्याचे चित्र आहे.

एखाद्या कार्यकर्त्याला नोकरीचा प्रश्न असो, दवाखान्यात उपवारांची गरज असो, महसूल किया वनखात्यातील काम असो, पोलीस स्टेशनमधील अडचण असो, शाळेचा प्रश्न असो अथवा विकासकामाचा पाठपुरावा असो, यशराज देसाई यांच्यापर्यंत थेट पोहोचण्याची कार्यकत्यांची मानसिकता तयार झाली आहे.

एवढेच नव्हे तर लग्न, मुंज, वाढदिवस अशा कौटुंबिक कार्यक्रमांनाही यशराज देसाई यांची उपस्थिती असते. सुखात सहभागी होणे सोपे असते; पण संकटात धावून जाण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि लोकांशी असलेली बांधिलकी लागते. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी घालून दिलेल्या राजकीय संस्कारांची परंपरा देसाई परिवाराने पुढे चालवली आहे. त्यामुळे यशराज देसाई हे केवळ कारखान्याचे चेअरमन किंवा राजकीय नेत्याचे विरंजीव म्हणून ओळखले जात नाहींत, तर युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत थेट संपर्क असलेले नेतृत्व म्हणून त्यांची प्रतिमा तयार होत आहे. शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शन आणि यशराज देसाई यांची मैदानातील सक्रियता हा देसाई गटाच्या संघटनात्मक ताकदीचा महत्त्वाचा आधार बनाला आहे.

दुसरीकडे भाजपचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या राजकीय कार्यपद्धतीकडे पाहिले तर रोगळे चित्र दिसते. त्यांच्याकडे राष्ट्रीय पक्षाचे पाठबळ, जिल्ह्यातील नेत्यांची ताकद आणि राजकीय अनुभवाची शिदोरी आहे. महा, या ताकदीचा उपयोग तळागाळातील संघटन मजबूत करण्यासाठी कितपत झाला, हा प्रश्न जिल्हा बँकेच्या निकालाने उपस्थित केला आहे.

निवडणुकीचे बिगुल वाजले की दारुगोला शोधायचा, राजकीय समीकरणांची जुळठाजुलव करायची आणि विरोधकांना रोखण्यासाठी ऐनवेळी मोर्वेबांधणी करायची; मात्र निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहण्याबाबत सातत्यावा अभाव असल्याची चर्चा त्यांच्या गोटातच होत असल्याचे चित्र आहे. कार्यकर्ते केवळनिवडणुकीतील मतदानाचे साधन नसतात, तर तेच राजकीय अस्तित्वाचे खरे बळ असतात, है पाटणकर गटाच्या लक्षात येण्यास उशीर झरना का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

जिल्हा बँकेतील ४२ वर्षाच्या वर्चस्वाला सुरुंग...

या निवडणुकीचा सर्वात मोठा राजकीय संदेश म्हणजे तब्बल ४२ वर्षाच्या वर्चस्वाला लागलेला सुरुंग होय. पाटणकर गटाचे जिल्हा बँकेतील एकमेव संचालकपदही यावेळी हातातून गेले. मागील निवडणुकीत चौदा मतांनी हुकलेला विजय यावेळी बारा मतांच्या आश्रीत बदलाना, म्हणजेच देसाई गटाने केवळ जुना पराभव शुऊन काढला नाही, तर पाटणकरांच्या राजकीय बालेकिल्ल्याला थेट हादरा दिला. एका बाजूला ४२ वर्षांची परंपरा आणि दुसऱ्या बाजूला नव्या नियोजनाची ताकद, या संघर्षांत अखेर देसाई गटाने बाजी मारली, हा निकाल पाटणच्या राजकारणातील सत्तासमीकरणे बदलणारा ठरला

नाराजी, असंतोष अन तुटलेला संपर्क....

देसाई गटाने यावेळी केवळ उघड प्रचारावर भर दिला नाही, तर पडद्यामागेही गनिमी काव्याने राजकीय मोर्चेबांधणी केानी, पाटणकरांच्या गोटातील एकेक मोहरा टिपण्यास सुख्यात झाली. कुठे नाराजी होती, कुठे असंतोष होता आणि कुठे नेतृत्वाशी संपर्क तुटला होता, याचा अचूक अंदाज घेतला गेला. गावोगावी जाऊन कार्यकत्यांना विश्वासात घेणे, सोसायट्यांचे ठराव शिवसेनेच्या बाजूने वळवण्यासाठी संघर्ष करणे आणि प्रत्येक मताचे महत्त्व ओळखून रणनीती आखणे, यामध्ये यशराज देसाई यांनी लक्ष घातले. कोणत्या गावात काय घडते आहे, कोणता कार्यकर्ता कोणत्या भूमिकेत आहे, कोणत्या संस्थेचे गणित बदलू शकते, याची वन टू वन माहिती घेतली जात होती. ही माहिती थेट शंभूराज देसाई यांच्या राजकीय मार्गदर्शनाखाली पुढील डावपेचांसाठी वापरण्यात आली. विरोधकांना वरवर चित्र वेगळे दिसत असताना देसाई गटाने मात्र आतून राजकीय चक्रव्यूहाची आखणी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT