Electric Shock Pudhari
सातारा

Satara electric shock Death: विजेचा धक्का बसून सचिवाचा मृत्यू

माण तालुक्यातील पाणवन येथे शेतातील विहिरीत मोटर सोडत असताना विजेचा धक्का बसून सेवा सोसायटीच्या सचिवांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली

पुढारी वृत्तसेवा

म्हसवड : माण तालुक्यातील पाणवन येथे शेतातील विहिरीत मोटर सोडत असताना विजेचा धक्का बसून सेवा सोसायटीच्या सचिवांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हणमंत नारायण नरळे (वय 43, रा. पाणवन) असे मृताचे नाव आहे.

नरळे यांच्या शेतातील विहिरीमधील वीज पंपाची मोटर बंद पडल्याने ती दुरुस्त करून पुन्हा विहिरीत सोडण्यासाठी ते वडील नारायण नरळे, आई व इतर दोघांसमवेत शेतात गेले होते. हणमंत यांनी मोटरीचा वीजपुरवठा बंद करून विहिरीत उतरून मोटर पाण्यात सुरक्षित ठिकाणी सोडण्यास सुरुवात केली.

मात्र, यावेळी त्यांचा तोल गेल्याने त्यांनी आधारासाठी विहिरीतील दुसऱ्या बंद स्थितीतील मोटरीला हात लावला. त्याचवेळी त्या मोटरीतून विजेचा धक्का बसल्याने ते मोटरीला चिटकून राहिले. ही बाब विहिरीवरील उपस्थितांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित मोटरीची केबल ओढून काढली. मात्र, तोपर्यंत हणमंत नरळे हे विहिरीतील खोल पाण्यात बुडाले होते. त्यांना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT