satara sangli solapur zilla parishad election result 2026 Pudhari
सातारा

Satara Sangli Solapur ZP Result 2026: सोलापुरात भाजप, साताऱ्यात अजित पवार गटाची सरशी; सांगली कोणाकडे? पाहा संपूर्ण निकाल

पश्चिम महाराष्ट्रतील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा लाईव्ह निकाल...

मोहन कारंडे

सातारा/सांगली/ सोलापूर: मिनी मंत्रालय असलेल्या राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल आज (दि. ९) जाहीर झाला. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रतील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा समावेश होता. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. एकुण ६८ जागांपैकी ४२ जागांवर भाजपने विजय मिळवला. तर सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठ यश मिळालं आहे. जिल्हा परिषदेच्या ६५ जागांपैकी ४७ जागांवर अजित पवार गटाला विजय मिळाला आहे. सांगलीमध्ये मात्र कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. जिल्हा परिषदेच्या ६१ जागांपैकी १७ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर त्या खालोखाल शरद पवारांची राष्ट्रवादी असून या पक्षाला १६ जागा मिळाल्या आहेत.

खानापूरच्या जनतेने केला भाजपचा सुपडा साफ

खानापूर तालुक्यातील चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती गणावर बाबर सेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेने एक हाती सत्ता काबीज करीत भाजपला अर्थाने व्हाईट वॉश च दिला.

सोलापूर जिल्हा परिषदेत कुणाला किती जागा?

सोलापूर जिल्हा परिषद 2026

एकुण जागा : 68

भाजप - 44

शिवसेना - 7

राष्ट्रवादी - 10

ठाकरे गट- 0

काँग्रेस : 0

इतर- 1

सांगोला पंचायत समितीवर शेकाप व दीपक आबा साळुंखे गटाची एक हाती सत्ता

पन्नास वर्षाची सांगोला पंचायत समितीवर असलेली शेकाप ची सत्ता अबाधित राखण्यात यश

सांगोला पंचायत समितीच्या 14 पैकी नऊ जागांवर शेकापचा विजय

सांगोला पंचायत समितीवर एक हाती सत्ता आल्यानंतर आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केला जल्लोष

सांगोला तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातील शेकाप चे उमेदवार यशराज साळुंखे यांचा पराभव झाल्याने एका डोळ्यात आनंदा अश्रू तर एका डोळ्यात दुःखद अश्रू असल्याच्या भावना बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केल्या

सातारा: पाटण पंचायत समिती सत्तांतर 14 पैकी नऊ जागा शिवसेनेला

पाटण पंचायत समितीची सत्तांतर

पाटण पंचायत समितीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते पालकमंत्री शंभूराज देसाई यांची सत्ता येणार

आतापर्यंत 14 पैकी 9 जागा शिवसेनेने जिंकल्या

सांगली जिल्हा परिषदेच्या 61 पैकी 54 जागांचा निकाल हाती

सांगली जिल्हा परिषदेच्या 61 जागांपैकी 54 जागांचा निकाल सध्या हाती आलाय. यामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप असून भाजपला 17 जागा मिळाल्यात. तर त्या खालोखाल शरद पवारांची राष्ट्रवादी असून या पक्षाला 16 जागा मिळाल्यात. मात्र, कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही.

सोलापूर: चिकलठाण गटातून अजित पवार गटाचे प्रशांत पाटील विजयी

चिकलठाण गट

प्रशांत पाटील 9716 विजयी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार

प्रमोद बदे 7589 पराभूत आघाडी

..

चिकलठाण गण

वनमाला चंद्रकांत सरडे 4875 विजयी ,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार

लताबाई गव्हाणे 3093 पराभूत आघाडी

उमरड गण

अदिती अतुल पाटील 6231 विजयी आघाडी

सोनाली देवकर 4847 पराभूत

सोलापूर बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा अभूतपूर्व विजयी

जिल्हा परिषदेच्या 6 पैकी 6 आणि पंचायत समितीच्या 12 पैकी 12 जागावर भाजपचा विजयी

दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी एकत्रित लढून देखील महाआघाडीचा दारुण पराभव

बार्शीचे ठाकरेंना गटाचे आमदार दिलीप सोपल यांना मोठा धक्का

बार्शी मध्ये मिळालेल्या विजयाबद्दल माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी मानले मतदारांचे आभार

साताऱ्यात भाजपच्या सोनल गोरे विजयी

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे विजयी

विक्रमी 18 हजार मताधिक्याने मिळवला विजय

सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपची एकहाती सत्ता

सोलापूर जिल्हा परिषद 2026

एकुण जागा - 68

भाजप - 39

शिवसेना - 6

राष्ट्रवादी - 10

ठाकरे गट- 0

काँग्रेस - 1

इतर- 2

सोलापुरात माजी आमदार दिलीप माने यांचे पुत्र पृथ्वीराज माने विजयी

उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी जिल्हा परिषद गटातून माजी आमदार दिलीप माने यांचे पुत्र भाजपचे पृथ्वीराज माने विजयी

तर तिऱ्हे पंचायत समिती गणातून भाजपच्या ऋतुजा बंडगर विजयी

मात्र कोंडी पंचायत समिती गणातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे धनाजी भोसले विजयी

भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे यांचा पराभव

सातारा कुकडवाड गटातून राष्ट्रवादीचे अनिल देसाई विजयी

भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे यांचा पराभव

सांगलीतील खरसुंडी गटात शिवसेनेचा झेंडा

खरसुंडी गटातून शिवसेना जयदीप भोसले विजयी खरसुंडी गणातून शिवसेना मीनाक्षी पुजारी विजयी नेलकरंजी गणातून सुनीता सरगर विजयी

करगणी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी शिवसेना गटाचे विनायक मासाळ, करगणी गणातून शिवसेनेचे दत्तात्रय पाटील माडगूळ गणातून दादासाहेब मोटे विजयी

सोलापूरातील चिखलठाण गटात अजित पवार गटाचा विजय

करमाळयातील चिखलठाण गटातील राष्ट्रवादी कॉग्रेस ( अजित पवार गट ) 1800 मतांनी विजयी

चिखलठाण गणातील राष्ट्रवादी कॉग्रेस ( अजित पवार गट ) वनमाला चंद्रकांत सरडे 1782 मतांनी विजयी

उमरड गणातील करमाळा तालुका विकास आघाडीचे उमेदवार अदिती अतुल पाटील 750 मतांनी विजयी

सांगली: खानापूर तालुक्यातील चारही जि प गटांत शिवसेनेची बाजी

नवव्या फेरी अखेर

खानापूर तालुक्यात करंजे, नागेवाडी, लेंगरे आणि भाळवणी या चारही जि प गटांत आणि आठ पंचायत समिती गणात शिवसेनेने बाजी मारली आहे.

नागेवाडी गट शीतल अमोल बाबर शिवसेना 10,583 मतांनी विजयी विरुद्ध सुजाता विजय माने (भाजपा)

नागेवाडी गणामध्ये सुवर्णा प्रशांत भोसले (शिवसेना) 4,106 मतांनी विजयी विरुद्ध भाजपा वर्षा सुनील गुरव

गार्डी गणामध्ये प्रतिभा सुरेश शेंडे शिवसेना 4,520 मतांनी विजयी विरुद्ध संगीता राजकुमार जगताप भाजपा

लेंगरे गटामध्ये मनीषा प्रकाश बागल शिवसेना 4,066 मतांनी विजयी विरुद्ध आरती संपतराव मोरे भाजपा

लेंगरे गणामध्ये पायल निवास कदम शिवसेना 2,517 विरुद्ध विजयी स्वाती संतोष कदम भाजपा

पारे गणात तेजश्री प्रमोद लोखंडे शिवसेना 2,293 विरुद्ध विजयी प्रियंका किरण साठे भाजपा

करंजे गटात सई आशिष कुमार शिंदे शिवसेना

413 विरुद्ध विजयी प्रिया सुनील खंदारे -पाटील भाजपा

बलवडी खा गणात सुहास मालोजी राव शिंदे शिवसेना 1,104 विरुद्ध विजयी तानाजी भीमराव पाटील भाजपा

करंजे गणात पांडुरंग अर्जुन खोत शिवसेना 195 मतांनी विरुद्ध विजयी शिवाजी धोंडीराम माने भाजपा

भाळवणी गटामध्ये हिम्मत बाजीराव जाधव शिवसेना 3,973 विरुद्ध विजयी नितीन शहाजीराव जाधव भाजपा

आळसंद गणामध्ये रोशन रमेश जाधव शिवसेना 1,855 विरुद्ध विजयी आकाश संभाजी माने भाजपा

भाळवणी गणात महेश आनंदराव घोरपडे शिवसेना 2,375 विरुद्ध आघाडीवर मोहन नाना धनवडे भाजपा

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग जिल्हा परिषदेत भाजपचा झेंडा

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग जिल्हा परिषदेत भाजपचा झेंडा

वळसंग जिल्हा परिषद गटामध्ये भाजप उमेदवार रामप्पा चिवडशेट्टी विजयी

तर वळसंग पंचायत समिती गणातून भाजपचे बलवान गोतसुर्वे आणि होटगी गणातून भाजपच्या अंबिका पाटील विजयी

मंगळवेढा तालुक्यात भाजपचे तीन उमेदवार विजयी

मंगळवेढा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटातील तीन गटाचे निकाल आले असून भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत तर सहा पंचायत समिती जागेवरील पाच जागा भाजप च्या ताब्यात आल्या आहेत

कामती मतदार संघातून भाजपाच्या विमलताई खताळ विजयी

सातारा: राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले विजयी

शिरवळ गटातून राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले विजयी, भाजपचे नितीन भरगुडे पाटील पराभूत

सातारा: मकरंद पाटील यांना धक्का

महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गटात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अजित सपकाळ विजयी. अजित सपकाळ हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत.

सांगलीत महाडिक गटाने राखला आपला गड

येलूर जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपाच्या हर्षदा राहुल महाडीक विजयी

सांगलीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खाते उघडले

जत मधील जाडरबोबलाद जिल्हा परिषद गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उघडले खाते

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सावित्री तमनगौडा रवी पाटील विजय

सांगली: नागेवाडी, लेंगरे, करंजे आणि भाळवणीमध्ये दुसऱ्या फेरीत कोण आघाजीवर? 

दुसऱ्या फेरी अखेर

भाजप एक गट आणि एका गणात तर उर्वरित सर्व ठिकाणी शिवसेना आघाडीवर

करंजे जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचे प्रिया सुनील खंदारे 242 मतांनी तर करंजे गणामध्ये 106 मतांनी आघाडीवर

नागेवाडी गट शीतल अमोल बाबर शिवसेना 3,550 मतांनी आघाडीवर विरुद्ध सुजाता विजय माने (भाजपा)

नागेवाडी गणामध्ये सुवर्णा प्रशांत भोसले (शिवसेना) 152 आघाडीवर विरुद्ध भाजपा वर्षा सुनील गुरव

गार्डी गणामध्ये प्रतिभा सुरेश शेंडे शिवसेना 2,308 मतांनी आघाडीवर विरुद्ध संगीता राजकुमार जगताप भाजपा

लेंगरे गटामध्ये मनीषा प्रकाश बागल शिवसेना 658 मतांनी आघाडीवर विरुद्धार्थी संपतराव मोरे भाजपा

लेंगरे गणामध्ये पायल निवास कदम शिवसेना 666 विरुद्ध आघाडीवर स्वाती संतोष कदम भाजपा

पारे गणात तेजश्री प्रमोद लोखंडे शिवसेना 201 विरुद्ध आघाडीवर प्रियंका किरण साठे भाजपा

करंजे गटात प्रिया सुनील खंदारे भाजपा 242

विरुद्ध आघाडीवर सई आशिष कुमार शिंदे शिवसेना

बलवडी खा गणात सुहास मालोजीराव शिंदे शिवसेना 106 विरुद्ध आघाडीवर तानाजी भीमराव पाटील भाजपा

करंजे गणात शिवाजी धोंडीराम माने भाजपा 106 विरुद्ध आघाडीवर पांडुरंग अर्जुन खोत शिवसेना

भाळवणी गटामध्ये हिम्मत बाजीराव जाधव शिवसेना 1,004 विरुद्ध आघाडीवर नितीन शहाजीराव जाधव भाजपा

आळसंद गणामध्ये रोशन रमेश जाधव शिवसेना 572 विरुद्ध आघाडीवर आकाश संभाजी माने भाजपा

भाळवणी गणात महेश आनंदराव घोरपडे शिवसेना 578 विरुद्ध आघाडीवर मोहन नाना धनवडे भाजपा

सांगली: नागेवाडी, लेंगरे, करंजे आणि भाळवणीमध्ये कोण आघाजीवर? 

पहिल्या फेरीत

नागेवाडी गट शीतल अमोल बाबर शिवसेना 2,046 मतांनी आघाडीवर विरुद्ध सुजाता विजय माने (भाजपा)

नागेवाडी गणामध्ये भाजपा वर्षा सुनील गुरव 76 मतांनी आघाडीवर विरुद्ध सुवर्णा प्रशांत भोसले (शिवसेना)

गार्डी गणामध्ये प्रतिभा सुरेश शेंडे शिवसेना 1461 मतांनी आघाडीवर विरुद्ध संगीता राजकुमार जगताप भाजपा

लेंगरे गटामध्ये मनीषा प्रकाश बागल शिवसेना 235 मतांनी आघाडीवर विरुद्धार्थी संपतराव मोरे भाजपा

लेंगरे गणामध्ये पायल निवास कदम शिवसेना 262 विरुद्ध आघाडीवर स्वाती संतोष कदम भाजपा

पारे गणात तेजश्री प्रमोद लोखंडे शिवसेना 83 विरुद्ध आघाडीवर प्रियंका किरण साठे भाजपा

करंजे गटात सई आशिष कुमार शिंदे शिवसेना 47 मतांनी आघाडीवर विरुद्ध प्रिया सुनील खंदारे भाजपा

बलवडी खा गणात सुहास मालोजीराव शिंदे शिवसेना 55 विरुद्ध आघाडीवर तानाजी भीमराव पाटील भाजपा

करंजे गणात पांडुरंग अर्जुन खोत शिवसेना 114 विरुद्ध आघाडीवर शिवाजी धोंडीराम माने भाजपा

भाळवणी गटामध्ये हिम्मत बाजीराव जाधव शिवसेना 549 विरुद्ध आघाडीवर नितीन शहाजीराव जाधव भाजपा

आळसंद गणामध्ये रोशन रमेश जाधव शिवसेना 250 विरुद्ध आघाडीवर आकाश संभाजी माने भाजपा

भाळवणी गणात महेश आनंदराव घोरपडे शिवसेना 391 विरुद्ध आघाडीवर मोहन नाना धनवडे भाजपा

सोलापूर: आष्टी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे विजयराज डोंगरे विजयी

मोहोळ तालुक्यातील आष्टी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विजयराज डोंगरे आष्टी पंचायत समिती गणात राष्ट्रवादीचेच डॉक्टर अमित व्यवहारे व खंडाळी पंचायत समिती गणात राष्ट्रवादीचेच गणेश मुळे विजयी

दक्षिण सोलापूर बोरामणी गट आणि कासेगाव, बोरामणी गणात भाजप विजयी

दक्षिण सोलापूर बोरामणी गट तिसरी फेरी पूर्ण. तिसऱ्या फेरी अखेर बोरामणी गटाचे नेताजी भाऊ खंडागळे 844 मतांनी विजयी. कासेगाव गणातून विजय उमाकांत राठोड 288 मतांनी विजयी. बोरामणी गणातून वर्षा सोमनाथ पटणे 2139 मतांनी विजयी.

सोलापूरात भाजपचे १७ उमेदवार आघाडीवर 

एकूण जागा - 68

भाजप -17

शिवसेना (शिंदे) - 05

राष्ट्रवादी (अजित पवार) -08

सोलापूरातील करकंब गटात भाजप विजयी

करकंबमधून भाजपचे आदिनाथ देशमुख विजयी, करकंब पंचायत समिती गणातून भाजपचे राहुल पुरवत विजयी, उंबरे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे राहुल मुळे विजयी

पंढरपूर तालुक्यात आमदार अभिजीत पाटील यांना मोठा धक्का

पंढरपूर तालुक्यातील करकंब गटातून भाजपचे आदिनाथ देशमुख विजयी

सांगली : कवठेमहांकाळ पंचायत समितीच्या नागज पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे उमेदवार वामन कदम याचा विजय

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गटातून भाजपाचे नेताजी खंडागळे विजय

माढा तालुक्यातील मानेगाव गटात पृथ्वीराज सावंत विजयी

पंढरपूर

माढा तालुक्यातील मानेगाव गटात पृथ्वीराज सावंत विजयी

भाजपच्या तिकिटावर उमेदवार होते पृथ्वीराज सावंत

तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत पृथ्वीराज सावंत

सांगली: दामाजी नगर जिल्हा परिषद गटातून भाजपचे रमेश भांजे विजयी

मंगळवेढा तालुक्यातील दामाजी नगर जिल्हा परिषद गटातून भाजपचे रमेश भांजे विजयी तर पंचायत समिती गणातून भाजपचा एक तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा एक उमेदवार विजयी

जिल्हा परिषद मिरज तालुक्यातील बेडग जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाचे अस्मिता आवळे आघाडीवर जत जाडर बोंबलाद जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सावित्री रवीपाटील आघाडीवर

सांगोल्यात शहाजी बापू पाटील यांची विजयी सलामी, महूद जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे दादा लवटे 2500 विजयी

सांगली जिल्ह्यातील पहिला निकाल हाती तासगाव पंचायत समितीच्या पेड गणातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमोद शेंडगे हे विजयी. 

सातारा पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने खातं उघडलं. भाजपला मोठा धक्का, शिवथर गणातून राष्ट्रवादीचे राजेश पवार 376 मतांनी विजयी

सांगलीत कोण आघाडीवर? 

जिल्हा परिषद एकूण जागा - 61

भाजप -1

शिवसेना (शिंदे) -

राष्ट्रवादी (अजित पवार) -

कॅांग्रेस -

शिवसेना (ठाकरे) -

राष्ट्रवादी (शरद पवार)

इतर -

आघाडी

पंचायत समिती - खानापूर

एकूण जागा - 08

कल किंवा निकाल -

भाजप -

शिवसेना (शिंदे) - 4

राष्ट्रवादी (अजित पवार) -

कॅांग्रेस -

शिवसेना (ठाकरे) -

राष्ट्रवादी (शरद पवार)

इतर -

सोलापूरातील मोहोळ तालूक्यातील आष्टी जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी अजित पवार उमेदवार विजयराज डोंगरे यांची पहिल्या फेरीत आघाडी

सांगलीतील खानापूर तालुक्यात जिल्हा परिषद गटात 2 आणि खानापूर पंचायत समितीच्या 4 गणामध्ये शिंदे सेनेचे उमेदवार आघाडीवर

सांगोला महुद जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे दादा लवटे आघाडीवर

सांगली जिल्ह्यातील करंजे जिल्हा परिषद गटातील शिंदे सेनेचे उमेदवार सई शिंदे आघाडीवर

सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव गटातून भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी या चपळगाव गटातून आघाडीवर

सोलापूर- सोलापूर जिल्हा परिषदेसाठी भाजप 7 जागांवर आघाडीवर राष्ट्रवादी 3 जागांवर आणि शिवसेना 1 जागावर आघाडीवर

सोलापुरातील पहिला निकाल हाती, भोसरेमधून अजित पवार गटाच्या अश्विनी दळवे विजयी

सोलापुरातील भोसरे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अश्विनी दळवे विजयी झाल्या आहेत.

शर्मिला विलास उबाळे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) - 9237 मते

अश्विनी योगेश दळवे (राष्ट्रवादी अजित पवार) - 12152 मते विजयी

नोटा - 239

मताधिक्य- 2915

सातारा: आतापर्यंतचा कल  

जिल्हा परिषद- सातारा

एकूण जागा - 65

कल - भाजप

भाजप - 01

शिवसेना (शिंदे) -

राष्ट्रवादी (अजित पवार) -

कॅांग्रेस -

शिवसेना (ठाकरे) -

राष्ट्रवादी (शरद पवार)

इतर -

पंचायत समिती -एकूण जागा - 130

कल -

भाजप -02

शिवसेना (शिंदे) -

राष्ट्रवादी (अजित पवार) -

कॅांग्रेस - 0

शिवसेना (ठाकरे) -

राष्ट्रवादी (शरद पवार)

इतर -

सोलापुरात टपाली मतमोजणी अद्याप सुरूच

उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज जिल्हापरिषद गटासाठी EVM मतमोजणी आणण्यात आल्या आहेत. टपाली मतमोजणी अद्याप सुरूच

साताऱ्याच्या कराडात मतमोजणीस प्रारंभ

कराडच्या शासकीय धान्य गोडाऊन परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. कराड तालुक्यात सातारा जिल्हा परिषदेच्या 12 आणि कराड पंचायत समितीच्या 24 जागांचा समावेश आहे. ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीसाठी 24 तर टपाले मतांच्या मोजणीसाठी 12 अशा एकूण 36 टेबलवर मतमोजणी होत आहे. टपाली व ईव्हीएम मशीनची मतमोजणी एकाच वेळी सुरू आहे.

सांगलीत मतमोजणीला सुरुवात

सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 61 गटासाठी आणि 10 पंचायत समितीच्या 122 गणांच्या पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 192 टेबल आणि 122 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होतं आहे.

सोलापुरात 'या' निकालाकडे लक्ष

माजी आ. रविकांत पाटील यांच्या पत्नी लक्ष्मी पाटील, आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी, भाऊ सागर कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे चिरंजीव शिवराज म्हेत्रे, मुलगी शीतल म्हेत्रे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे अर्जुनसिंह मोहिते-पाटील, सून वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील यांचे चिरंजीव, माजी आ. राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते, माजी आ. दिलीप माने यांचे पुत्र पृथ्वीराज माने, माजी मंत्री (कै.) दिगंबरराव बागल यांच्या कन्या रश्मी बागल हे दिग्गज यंदाच्या निवडणुकीत रिंगणात असल्याने निकालाची उत्सुकता वाढली आहे.

सोलापूर मिनी मंत्रालयावर भाजप की आघाडी ?

मिनी मंत्रालयावर भाजप की राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांची आघाडी सत्तेत येणार, याबाबतचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.

सातारा: दुपारपर्यंत निकालाचे चित्र होणार स्पष्ट

या निवडणुकीमध्ये भाजपने संपूर्ण जिल्ह्यात स्वबळ आजमावले आहे. कोरेगाव तालुक्याचा अपवाद वगळता सर्वच ठिकाणी भाजपने कमळ चिन्हावर उमेदवार उभे केले. भाजपच्या या शत-प्रतिशत नीतीला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, रासप, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, बसपा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपल्या पक्षातर्फे उमेदवार उभे केले. या निवडणुकीतील खरी लढत ही राज्याच्या व केंद्राच्या सत्तेत असलेल्या महायुतीमधील घटक पक्षांमध्येच झाली. सत्तेमध्ये असूनदेखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने बेदखल केलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी चौताळून उठत अनेक ठिकाणी युतीचा फॉर्म्युला अवलंबला.

साताऱ्यात भाजप की राष्ट्रवादी?

या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील चार मंत्री, आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार अशा डझनभर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयावर राष्ट्रवादी की भाजपचा झेंडा फडकणार, याचा फैसला थोड्याच वेळात स्पष्ट होत आहे.

सांगलीतील मतमोजणीची तालुकानिहाय ठिकाणे...

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ५५१ उमेदवारांची मतमोजणी आज, सोमवार दि. ९ रोजी तालुकास्तरावर होणार आहे. तालुका आणि मतमोजणीची ठिकाणे अशी आटपाडी नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय (पहिला मजला हॉल), जत : जुने शासकीय धान्य गोदाम क्र. २, तहसील कार्यालयाच्या समोर, खानापूर : इनडोअर स्पोर्टस् फॅसिलिटी सेंटर, बळवंत कॉलेज, विटा, कडेगाव : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कराड-कडेगाव रोड, तासगाव : शासकीय बहुउद्देशीय कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दत्तमाळ, कवठेमहांकाळ : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पुरवठा शाखेसमोरील मोकळी जागा, पलूस : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला (दिवाणी न्यायालयाजवळ), वाळवा : शासकीय धान्य गोदाम, बहे रोड, ईश्वरपूर, शिराळा : श्री गोरक्षनाथ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मिरज : शासकीय नवीन धान्य गोदाम, वैरण बाजार.

सांगली: गेल्या (२०१७) निवडणुकीतील पक्ष आणि संख्याबळ...

भाजप - २६ राष्ट्रवादी - १५ काँग्रेस - ९ शिवसेना - ३ रयत विकास आघाडी - ४ घोरपडे गट - २ स्वाभिमानी शेतकरी संघटना - १ एकुण - ६०

Satara Sangli Solapur ZP Result 2026 LIVE:

सातारा/सांगली/ सोलापूर: जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शनिवारी चुरशीने मतदान झाल्यानंतर आज (दि. ९) होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष लागून राहिले आहे. खुल जा सिमसिममधून कुणाला लॉटरी लागणार? अन् कुणाची विकेट निघणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पश्चिम महाराष्ट्रतील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा निकाल आज जाहीर होत आहे.

सांगलीत भाजपसाठी वर्चस्वाची लढाई

सांगली जिल्हा परिषद व दहा पंचायत समित्यांसाठी मोठ्या चुरशीने ७० ते ७१ टक्के मतदान झाले. २०१७ मधील निवडणुकीत ७१.२४ टक्के मतदान झाले होते. जिल्हा परिषदेच्या २११, तर पंचायत समित्यांच्या ३४०, अशा एकूण ५५१ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद आहे. भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेनेसह आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मतमोजणी आज प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होत असून निकालाची मोठी उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

महाविकास आघाडी आणि महायुतीच्या स्थापनेनंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे. भाजपसाठी ही वर्चस्वाची, तर काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेनेसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी आघाडी-युती करणार असल्याचे वक्तव्य सातत्याने करण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र आघाडी-युती झालीच नाही. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार उभे केले, तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसने मात्र समझोता करीत उमेदवार रिंगणात उतरवले.

साताऱ्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

सातारा जिल्हा परिषद व जिल्ह्यातील ११ पंचायत समितींसाठी मतदान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ६५ तर पंचायत समितीच्या १३० जागांसाठी सुमारे ६७ टक्क्यांवर मतदान झाले आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यात ६८.९० टक्के मतदान झाले होते. आज जिल्हा परिषदेच्या २३१, तर पंचायत समितीच्या ३९५ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात असल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्री जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, माजी आमदार मदन भोसले, माजी आमदार नरेंद्र पाटील, यांचे कुटुंबीय निवडणूक रिंगणात उतरले होते.

सोलापुरात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ६० टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यातील ६८ गटासाठी २७१ आणि ११ पंचाय समितीच्या १३६ गणासाठी ४८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपविरुद्ध अन्य पक्ष असा सामना रंगला. राष्ट्रवादी अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाठा, काँग्रेस या पक्षांत काही ठिकाणी एकत्रित तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळाल्या.

भाजपने मिशन ३५ प्लसचा नारा देत अनेक आजी-माजी आमदारांना आपल्यासोबत घेतले आहेत. तर दुसरीकडे तालुक्यात आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT