राजकन्या ऋणालीराजे व चि. रविराज यांना शाही विवाह सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ‌‘पुढारी‌’चे मुख्य संपादक व चेअरमन डॉ. प्रतापसिंह जाधव, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री मकरंदआबा पाटील व अन्य मंत्रिगण. समवेत वधूपिता सार्वजनिक बांधकाममंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, वरपिता पृथ्वीराजबाबा देशमुख. Pudhari Photo
सातारा

Runaliraje-Raviraj royal wedding: ऋणालीराजे-रविराज यांचा शाही विवाह सोहळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दै. ‌‘पुढारी‌’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यासह मंत्रिगणांची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे वारसदार व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि सौ. वेदांतिकाराजे भोसले यांची कन्या राजकुमारी ऋणालीराजे आणि कडेपूर (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील पृथ्वीराजबाबा देशमुख व वृषालीदेवी यांचे सुपुत्र रविराज यांचा शाही विवाह सोहळा राजधानी साताऱ्यानजीकच्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर दिमाखदार वातावरणात पार पडला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दै. ‌‘पुढारी‌’चे मुख्य संपादक व चेअरमन पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांच्या उपस्थितीने या शाही सोहळ्याला चार चाँद लागले.

ऋणालीराजे व रविराज यांच्या शाही विवाह सोहळ्याची तयारी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या साताऱ्यालगतच्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर करण्यात आली होती. या नेत्रदीपक सोहळ्याबाबत जिल्हावासीयांसह राज्यभरातील जनतेमध्ये कमालीचे औत्सुक्य होते. गुरुवारी सायंकाळी आई तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाने पावन झालेल्या भव्य प्रांगणात हा शाही विवाह सोहळा पार पडला. देशभरातील राजघराणी व मंत्रिमंडळातले बहुसंख्य मंत्री नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी या विवाह सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते.

या मंगलमय सोहळ्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, वनमंत्री गणेश नाईक, समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषिमंत्री दत्तामामा भरणे, पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खा. उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे खा. शाहू महाराज, माजी खासदार संभाजीराजे, उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, खा. नितीन पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री आ. जयंत पाटील,

आ. अतुल भोसले, आ. महेश शिंदे, आ. शशिकांत शिदे, आ. मनोजदादा घोरपडे, आ. सचिन पाटील, शेकापचे आ. जयंत पाटील, आ. विनय कोरे, आ. विश्वजित कदम, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. राहुल कुल, आ. अतुल सावे, आ. समीर कुणावार, आ. रत्नाकर गुट्टे, आ. अभिमन्यू पवार, आ. संभाजी पाटील-निलंगेकर, आ. रमेश कऱ्हाड, शिवरुपराजे खर्डेकर, कृष्णा उद्योग समूहाचे डॉ. सुरेश भोसले, माजी आ. बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे, आनंदराव पाटील, मदनदादा भोसले, डॉ. दिलीप येळगावकर, सुनील माने, धैर्यशील कदम, चित्रलेखा माने, राजूभैया भोसले, डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्यासह देशभरातील राजघराणी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिसप्रमुख तुषार दोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, दै. ‌‘पुढारी‌’चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, निवासी संपादक हरीश पाटणे तसेच महाराष्ट्रातील उच्चपदस्थ अधिकारी, विविध विभागांचे सचिव, उपसचिव, विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस प्रमुख, विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

वधू-वरांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 10 लाखांचा धनादेश

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला वधू-वरांकडून 10 लाखांचा धनादेश देण्यात आला. हा धनादेश स्वीकारताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दै. ‌‘पुढारी‌’चे संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह मंत्रिगण उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवेंद्रराजे व वधू-वरांच्या या कृतीचे कौतुक केले. हा अत्यंत चांगला पायंडा या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने पाडला आहे. त्याचे अनुकरण महाराष्ट्रातील इतरांनी केले पाहिजे, असे ना. फडणवीस म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT