रहिमतपूरमध्ये भंगार दुकानाला भीषण आग  
सातारा

Satara Fire Incident| रहिमतपूरमध्ये भंगार दुकानाला भीषण आग

परिसरात काही काळ भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

कोरेगाव : रहिमतपूर शहरातील रहिमतपूर-सातारा रस्त्यावरील एका भंगार व्यावसायिकाच्या दुकानाला सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दुकानातील साहित्य जळून मोठे नुकसान झाले. मात्र, अग्निशामक दल, पोलीस प्रशासन आणि स्थानिकांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच रहिमतपूर आणि सातारा नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. याचबरोबर सपोनि विनोद नेवसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्‍थळी नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी गर्दी हटवून परिसर सुरक्षित केला. अग्निशामक दलाचे जवान, पोलीस दल, महावितरण कंपनीचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग नेमक्‍या कोणत्‍या कारणामुळे लागली हे समजू शकले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT