Satara Theft: दोघांकडून चोरीचे 10 गुन्हे उघड Pudhari Photo
सातारा

Satara Theft: दोघांकडून चोरीचे 10 गुन्हे उघड

कराड (ता. पाटण) तालुक्यातील घरफोड्या तसेच शेतीपंप चोरणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळून पोलिसांनी 10 गुन्हे उघडकीस आणले

पुढारी वृत्तसेवा

सातारा : कराड (ता. पाटण) तालुक्यातील घरफोड्या तसेच शेतीपंप चोरणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळून पोलिसांनी 10 गुन्हे उघडकीस आणले. दोघांच्या टोळीकडून पोलिसांनी 9 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उघड झालेल्या सर्व चोऱ्या कराड शहर, कराड तालुका, मसुर, कोयनानगर, पाटण येथील आहेत. गणेश दिलीप जाधव (वय 30, रा. उंब्रज, ता. कराड), अमोल लालासो शेळके (36, रा. ढेबेवाडी ता. पाटण) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला अशी माहिती मिळाली की घरफोडीतील काही संशयित कोळेवाडी येथील एका बारमध्ये येणार असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. दोघेजण संशयितरीत्या फिरत असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी चोऱ्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांची पोलिस कोठडी घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी 10 चोऱ्या केल्याचे सांगितले.

संशयितांनी कराड शहर, कराड तालुका, मसुर, कोयनानगर, पाटण या पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे केल्याचे सांगितले. चोरट्यांनी गुन्हे करताना वापरलेले वाहन, हत्यार, तसेच गुन्ह्यातील 4 तोळ्याचे सोने, चांदी असा एकूण 8 लाख 86 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT