सुपारीबाज कोयता गँगला फिरवले 
सातारा

Satara Crime : सुपारीबाज कोयता गँगला फिरवले

नागरिकांची मोठी गर्दी; करंजे हल्ला प्रकरण

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सुपारी देऊन करंजे येथील गॅरेज चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना बुधवारी पोलिसांनी घटनास्थळ दाखवण्यासाठी तेथे फिरवले. हल्लेखोरांना तेथे आणल्याचे समजताच नागरिकांनी परिसरात गर्दी केली होती.

गेल्या आठवड्यात करंजे नाका परिसरात गॅरेज चालकावर टोळक्याने दहशत माजवत कोयत्याने हल्ला चढवला होता. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसर हादरून गेला. हल्ल्यावेळी नागरिकांची गर्दी झाली आणि एका संशयिताला नागरिकांनीच पकडून त्याला बदडले. पोलिस वेळीच पोहचल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला. कोयता गँगचा साताऱ्यात नंगानाच वाढल्याने नागरिकांनी कायदा हातात घेतल्याचे चित्र निर्माण झाले होते. या घटनेनंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ संशयितांची शोध मोहीम राबवली. कोयता गँगला अटक केल्यानंतर त्यांना पोलिस कोठडी मिळाली. कोयता हल्ल्याच्या तपासाचा भाग म्हणून बुधवारी दुपारी शाहूपुर पोलिसांनी संशयित टोळक्याला करंजे नाक्यावर आणले. संशयित चालवत आणून कोणी कसा हल्ला केला? रेकी कोणी केली होती? कोण कुठून पळून गेला? हा घटनाक्रम पोलिसांनी संशयितांकडून समजून घेतला. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, पोलिसांच्या या कृतीमुळे गुन्हेगारांचे भय मोडीत निघेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT