सातारा : सातारामध्ये गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटन वाढू लागले आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक कास पठाराकडे येऊ लागले आहेत.
अशातच काही अतिउत्साही पर्यटक रस्त्यामध्येच गाड्या लावून डान्स करताना तसेच इतर पर्यटकांना त्रास देताना पाहायला मिळत आहेत. कालच पुढारी न्युजने अतिउत्साही पर्यटकांचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर सातारा तालुका पोलीस अलर्ट मोडवर आल्याचे आज पाहायला मिळाले. आज पासून सातारा कास रोडवरील यवतेश्वर घाटामध्ये प्रत्येक गाडीची तपासणी करूनच गाडी सोडत होते. आज सातारा तालुका पोलिसांनी दहा ते बारा गाड्यांवर दंडात्मक कारवाई केल्याचे पाहायला मिळाले.