सातारा : जिल्हा पोलिस दलात प्रलंबित असलेल्या पोलिस निरीक्षक व सहायक पाेलिस निरीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकार्यांच्या अखेर बदल्या झाल्या. खंडाळा येथे पो. नि. महेंद्र जगताप, तर शिरवळसाठी पो.नि. महेेश इंगळे यांची नियुक्ती झाली आहे. एकूण १० पोलिस निरीक्षक व १६ स.पो.नि. यांच्या बदल्या झाल्या आहेत. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी बुधवारी याबाबतचे आदेश काढले.
वाईसाठी पो.नि. प्रदीप सूर्यवंशी, फलटण शहरसाठी पो.नि. घनशाम बल्लाळ, कराड तालुक्यासाठी पो.नि. शीतलकुमार कोल्हाळ, महाबळेश्वरसाठी पो.नि. हर्षद गालिंदे, कोरेगावसाठी पो.नि. अरुण देवकर, 'जिवीशा'साठी पो.नि. दत्तात्रय देशमुख, सायबर व एएचटीयूसाठी पो.नि. अरविंद काळे यांची बदली झाली.
स.पो.नि.मध्ये सातारा शहर वाहतूकसाठी राजेश माने, स.पो.नि. अभिजित यादव यांची एलसीबीमध्ये, स.पो.नि. भाऊसाहेब गोसावी यांची दहिवडी प्रभारी, स.पो.नि. सुनील जानकर यांची औंध पोलिस ठाणे, स.पो.नि. संदीप साळुंखे यांची कराड वाहतूक शाखेसाठी, स.पो.नि. राजेश माळी यांची सायबर, स.पो.नि. अभिजित चौधरी यांची कराड शहर, स.पो.नि. रघुनाथ शिंदे यांची काेरेगाव पोलिस ठाण्यामध्ये बदली झाली. याशिवाय इतर स.पो.नि. यांच्या मोठ्या पोलिस ठाण्यांसाठी, तर १५ फौजदार यांच्या जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये बदल्या झाल्या आहेत.
खंडाळा, शिरवळमध्ये खमक्या कामाची अपेक्षा
खंडाळा व शिरवळमध्ये गुन्हेगारी स्तोम वाढले आहे. खून, मारामारी, जागांचे ताबे मारणे, अमली पदार्थांची सर्रास विक्री यामुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत आहेत. शिरवळमध्ये वाढत्या औद्योगिकीकरणाला याचा फटका बसत आहे. दोनच दिवसांपूर्वी दैनिक 'पुढारी'ने खंडाळा, शिरवळसाठी चांगल्या पोलिस अधिकार्यांची गरज असल्याबाबतची भूमिका मांडली होती.