Suspended 
सातारा

Satara Police : तक्रारदार महिलेशी लगट; पोलिस सस्‍पेंड

पुसेगाव येथील घटना: पोलिस अधीक्षकांकडून कारवाईचा दणका

पुढारी वृत्तसेवा

सातारा : महिला तक्रारदाराशी ओळख निर्माण करून तिच्या वैवाहिक परिस्थितीचा गैरफायदा घेत विवाहाचे आश्‍वासन देऊन पोलिसानेच महिलेशी लगट केली. याप्रकरणी पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी कारवाईचा दणका देत पोलिसाला निलंबित (सस्‍पेंड) केले. अमोल अशोक लोखंडे असे निलंबित केलेल्‍या पोलिसाचे नाव आहे. अमोल लोखंडे हा पुसेगाव पोलीस ठाण्यात नियुक्त होता.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, तक्रारदार महिलेचे पुसेगाव पोलिस ठाण्यात काम होते. त्‍यातून पोलिस अमोल लोखंडे याने त्‍या महिलेची ओळख काढली. लोखंडे याने तक्रारदार महिलेशी ओळख वाढवून तिच्या वैवाहिक परिस्थितीबाबत सहानुभूती दाखवली. त्‍याने महिलेला विवाहाचे आश्‍वासन दिले; मात्र स्वतःच्या वैवाहिक स्थितीबाबत माहिती न देता तिच्याशी शारीरिक जवळीक साधली. संबंधित महिलेला पोलिसाच्या विवाहाची माहिती समजल्‍यानंतर त्‍यांनी तक्रार केली. त्‍यानुसार प्राथमिक चौकशी झाल्‍यानंतर एसपी निखिल पिंगळे यांनी पोलिसाला निलंबित केले.

पोलीस दल हे शिस्तीचे खाते असून अधिकारी व अंमलदारांकडून प्रामाणिकपणा, सचोटी, नैतिकता आणि जबाबदार वर्तन अपेक्षित असते. कायद्याचे रक्षक म्हणून काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा, जनमानसातील विश्वास आणि खात्याची शिस्त यांच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. संबंधित कर्मचाऱ्याचे वर्तन शासकीय सेवकास अपेक्षित असलेल्या शिस्तबद्ध व नैतिक आचरणाविरोधात असल्याच्‍या कारणावरून निलंबन करण्‍यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT