सातारा

Satara Crime: शेतीपंपांच्या केबल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पाणी उपसा पंपांवरील तांब्याच्या केबल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे

पुढारी वृत्तसेवा

पिंपोडे बुद्रुक : वाठार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देऊर (ता. कोरेगाव) येथील शेतकऱ्यांचे पाणी उपसा पंपांवरील तांब्याच्या केबल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

या कारवाईमुळे परिसरात केबल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला. ​देऊर येथील मळवी शिवारात अजित कदम यांच्या शेतातील तांब्याची केबल चोरण्याचा प्रयत्न दोन चोरटे करत होते.

दरम्यान, ग्रामसुरक्षा दल, पोलिस पाटील आणि वाठार पोलिसांच्या सतर्कतेमुळे या चोरट्यांना रंगेहात पकडण्यात यश आले. वाठार पोलिसांनी दोन्ही चोरट्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी देऊर आणि तळीये परिसरातील ६ शेतकऱ्यांच्या विहिरी आणि धरणालगतच्या पंपांवरील तांब्याच्या केबल चोरल्याची कबुली दिली. या कारवाईमुळे एकूण ३ गुन्हे उघडकीस आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT