सातारा

Satara: केरळम्‌‍मधून पलायन केलेले तीन संशयित गजाआड

तासवडे टोलनाक्यावर नाकाबंदी

पुढारी वृत्तसेवा

तासवडे टोलनाका : महिलेची सोन्याची चैन हिसकावून केरळम्‌‍मधून पळ काढणाऱ्या तिघा संशयितांना पकडण्यात तळबीड पोलिसांना यश आले. केरळम्‌‍ पोलिसांशी समन्वय साधत केलेल्या या कारवाई एक कार जप्त केली. केरळम्‌‍मधील हेमअंबिका नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चैन स्नॅचिंगची घटना घडली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपी कारमधून महाराष्ट्राच्या दिशेने निघाल्याची माहिती केरळम्‌‍ पोलिसांना मिळाली होती. त्यांनी सातारा जिल्हा पोलिस प्रमुख निखिल पिंगळे यांच्याशी संपर्क साधला.

त्यानंतर पोलिस अधीक्षक पिंगळे यांच्या आदेशानुसार तळबीड पोलिसांनी पुणे-बंगळूर महामार्गावर तासवडे टोलनाक्यावर पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळबीड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी सुरू केली होती.

यावेळी संशयित कारमधून प्रवास करत असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत केरळम्‌‍मधील एका महिलेची सोन्याची चैन हिसकावून पळ काढल्याची कबुली संशयितांनी दिली. संशयितांसह जप्त केलेले वाहन केरळम्‌‍ पोलिसांच्या ताब्यात दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT