घरफोडी, मोबाईल चोरीप्रकरणी तिघे गजाआड 
सातारा

Satara Crime : घरफोडी, मोबाईल चोरीप्रकरणी तिघे गजाआड

शिरवळ पोलिसांची कामगिरी; सव्‍वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्‍त

पुढारी वृत्तसेवा

शिरवळ : शिरवळ येथील दत्तनगरमध्ये घर फोडून चोरी तसेच फूलमळा परिसरात पादचाऱ्याला मारहाण करून मोबाईल लुटण्याच्या दोन स्वतंत्र घटनांचा शिरवळ पोलिसांनी छडा लावला. या प्रकरणांत तीन जणांना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी संशयितांकडून २ दुचाकींसह ३ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दत्तनगर येथील घराची कडी तोडून सोन्याचे दागिने व रोख रकमेसह सुमारे २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल १२ ऑगस्ट रोजी चोरीला गेला होता. तसेच फूलमळा परिसरात जेवण करून रूमकडे पायी निघालेल्या युवकाला मारहाण करून त्याचा मोबाईल पळविला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी तपास सुरू केला. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे साहिल विजय कोळी (वय २१, रा. शिरवळ) याला गजाआड केले.त्याच्यासोबत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले मोबाईल लुटीच्या घटनेतील संशयित सीसीटीव्हीच्या आधारे निष्पन्न झाले.

याप्रकरणी अनिरुद्ध सुमीत गायकवाड (वय २५, रा. भोळी) व आर्यन जीवन जाधव (२४, रा. शिरवळ) यांना अटक केली असून आणखी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही गुन्ह्यांतील तिघांना खंडाळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT