Udayanraje Bhosale File Photo
सातारा

Udayanraje Bhosale: खा. उदयनराजेंबाबत आक्षेपार्ह कमेंट; आठ फेसबुकधारकांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले आणि श्री. छ. वीरप्रतापसिंह उदयनराजे भोसले यांच्याबाबत फेसबुकवरील व्हिडीओवर आक्षेपार्ह व बदनामीकारक कमेंट केल्याप्रकरणी आठ फेसबुक अकाैंटधारकांविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते विजय कृष्णा गाढवे (६६, रा. कृष्णानगर, सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली. २६ ऑगस्ट रोजी फेसबुकवरील 'व्हिसीन मराठी' या न्यूज चॅनलच्या अकाैंटवर उदयनराजे भोसले यांच्याबाबत व्हिडीओ प्रसारित करण्यात आला होता. त्यावर आक्षेपार्ह कमेंट करून विविध समाजघटकांत द्वेष व सामाजिक तेढ निर्माण करण्याचा, शांतता भंग करण्याचा तसेच संबंधितांची सामाजिक प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

याप्रकरणी आशीर्वाद चव्हाण, बाळासाहेब नलघे, उल्हास चौलकर, विजय सागर, प्रदीप जगताप, गुलाबराव सरकटे, रणजीता व किरण चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT