सातारा

Satara Navratri celebrations : गरबा, रास दांडियासाठी जागू लागल्या रात्री

‘ढोली तारो ढोल बाजे’ चे सूर; जनजीवनावर उत्सवाचा माहोल

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यात उपासना व अध्यात्मासह आदिशक्तीच्या भक्तीचा जागर केला जात आहे. जनजीवनावर उत्सवाचा माहोल जाणवत आहे. सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांसह विविध मंदिरांमध्ये धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. सर्वत्र गरबा, दांडियासाठी रात्री जागू लागल्या आहेत. ग्रामीण भागातही गरबा व रास दांडियाची धूम सुरू असून ढोली तारो ढोल बाजेसह विविध दांडिया गीतांचे सूर ऐकू येत आहेत.

घटस्थापनेपासून जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू आहे. भक्‍तिभावाने आदिशक्तीचा जागर केला जात असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने दांडियांचे आयोजन करण्यात आले असून महिला, युवक, युवती सहभागी होत आहेत.

शहरी भागातील रास दांडियाचे लोण ग्रामीण भागात पोहचल्याने गाव, वस्तीवरही मोठ्या प्रमाणावर दांडियाचे आयोजन केले जात आहे. परिणामी ग्रामीण भागातही दांडियाची धूम सुरू झाली आहे. सातारा शहरासह गावोगावी गरबा, दांडियासाठी रात्री जागू लागल्या आहेत. विविध हिंदी मराठी रिमिक्स गाण्यांच्या तालावर ठेका धरला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT