Mobile  Pudhari
सातारा

Satara News : रयत सेवकाच्या स्टेटसवरुन सोशल मीडियावर धुमाकूळ

संस्थेकडून संबंधिताचा माफीनामा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : रयत शिक्षण संस्थेतील एका रयत सेवकाच्या वॉटस्अप वरील स्टेटसवरुन सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एका शिवप्रेमीने संबंधिताला संघी शिक्षक म्हणत त्याचा खरपूस सामाचार घेतल्याचीही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने रयतकडून या शिक्षकाचा शोध घेण्यात आला. त्या रयत सेवकाचा माफीनामा लिहून घेत पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे.

सध्या जनगणनेचे काम सुरु असून बहुतांश शिक्षक त्यामध्ये व्यस्त आहेत. अशात एका शिक्षकाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलची भावना शब्दरुपात आपल्या स्टेटसवर ठेवल्याने यावरुन भडकलेल्या राष्ट्रप्रेमींने फोनवरुन संबंधितांचा खरपूस समाचार घेतल्याची ऑडिओक्लीप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. संघी रयत सेवक म्हणून संबंधिताचा खरपूस समाचार घेतल्याने या ऑडिओक्लिपने सोशल माध्यमावर धुमाकूळ घातला होता. याची माहिती मिळताच रयत शिक्षण संस्थेकडून या सेवकाचा शोध घेण्यात आला. रयतच्या नेर्ले, ता. हातकणंगले येथील शाखेतील हा सेवक असल्याचे समोर आले आहे. संबंधित स्टेटस व एकूणच सर्व प्रकाराबद्दल त्या रयत सेवकाकडून माफीनामा लिहून घेत या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला आहे.

संबंधित रयत सेवकाला रयत शिक्षण संस्थेकडून समज देण्यात आली आहे. त्याने केलेली चूक मान्य करत दिलगिरी व्यक्त केली आहे. संबंधित सेवकावर उचित कारवाईचा प्रस्ताव वरीष्ठांकडे पाठवण्यात आला आहे.
-बी. एन. पवार, माध्यमिक सहसचिव रयत शिक्षण संस्था.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT