सातारा

Satara News: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गुरुवारी मुलाखती

नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे धुमशान सुरु झाले असून सर्व पक्षांच्यावतीने मुलाखतींचा सिलसिला सुरु झाला आहे

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे धुमशान सुरु झाले असून सर्व पक्षांच्यावतीने मुलाखतींचा सिलसिला सुरु झाला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने गुरुवार, दि. 13 रोजी राष्ट्रवादी भवन येथे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, वाई, फलटण, रहिमतपूर, म्हसवड, पाचगणी, महाबळेश्वर, मलकापूर या 9 नगरपालिका व मेढा नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष व सदस्यपदासाठी पक्षाकडे विहित नमुन्यात अर्ज केलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे व माजी मंत्री बाळासाहेब पाटील घेणार आहेत. गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत राष्ट्रवादी भवन, सातारा येथे या मुलाखती होतील.

इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी केले आहे. यावेळी निवडूण येऊ शकणारा हाच निकष लावून संधी दिली जाणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. त्यादृष्टीने अशा उमेदवारांचा शोध घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT