आलवडीत भुस्खलन; शेतीचे नुकसान 
सातारा

Satara Rain update : आलवडीत भुस्खलन; शेतीचे नुकसान

शिंदेवाडीत विद्युत पोल भुईसपाट : भात शेतीला फटका

पुढारी वृत्तसेवा

परळी : परळी खोऱ्यात पावसाचे थैमान सुरू असून अतिवृष्टीमुळे काही गावातील एसटी वाहतूक सेवा ठप्प करण्यात आली आहे. अलवडी येथे भूस्खलन झाल्यामुळे डोंगराचा भाग गावातील शेतीवर कोसळला आहे. त्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. शिंदेवाडी येथे विद्युत पोल पडले आहेत.

परळी खोऱ्यातील पाटेघर डोंगराच्या वरती वसलेल्या आलवडी येथे मंदिराच्या वरच्या बाजूस डोंगराचा भाग खचला. त्यामुळे मातीचे ढिगारे व पाण्याचा प्रवाह गावात येऊन भात शेतीचे तसेच रस्त्याचे नुकसान झाले आहे. येथील विद्युत पुरवठाही गेल्या दोन दिवसांपासून खंडित होत असल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावातील काही घरांना तडे गेले आहेत. काही ठिकाणी उपळे फुटले आहेत. त्यामुळे घरांचे व गुरांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. निगुडमाळ, नित्रळ या ठिकाणी अतिवृष्टीमुळे पाणी भात शेतीत साचल्याने भात रोपे कुजु लागली आहेत. रोपांपेक्षा पाणी जास्त असल्याने रोपे जमिनीत गाडली जाऊ लागली आहेत. अशीच परिस्थिती सांडवली, पांगारे, कुस बुद्रुक, बनघर खडगाव अशा गावांमध्ये होऊ लागली आहे.

शिंदेवाडी गावात जात असताना असलेल्या वळणावर झाड लाईटच्या खांबावर पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला असून या ठिकाणी चे झाड उद्योजक संतोषदादा भोसले यांनी जेसीबी मशीन पाठवून हटवले. या ठिकाणच्या विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रोहोट पाटेघर केळवली रस्त्यावर मोठ-मोठी दगडे, मातीचा ढिगारा वाहून येत असल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प होत आहे. ठोसेघर पठारावरील चिखली जांभे या ठिकाणी सुरक्षितेच्या दृष्टीने एसटीच्या फेरा बंद असल्याने या गावाची वाहतूक व्यवस्था ठप्प आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT