Pudhari File Photo
सातारा

Satara News: जिल्ह्यातील 125 शिक्षकांचे प्रमाणपत्र अपात्र

52 शिक्षकांची पात्रता प्रलंबित : आरोग्य विभागाची माहिती

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या अहवालात 125 शिक्षकांचे प्रमाणपत्र अपात्र ठरवण्यात आले आहे. तर 52 शिक्षकांची योग्य, अयोग्य पात्रता प्रलंबित ठेवण्यात आली असल्याची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली.

प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये काही शिक्षकांनी बदल्यामध्ये सूट मिळवण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केली. काही शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार जिल्हा परिषद प्रशासनाकडे आली. त्यानंतर ज्या शिक्षकांनी वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केली आहेत. त्या प्रमाणपत्राची तपासणी छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी केली.

वैद्यकीय महाविद्यालयाकडे दि.23 मे रोजी 583 शिक्षक व दि. 2 जून रोजी 592 शिक्षक तपासणीसाठी पात्र होते. तपासणीसाठी 622 शिक्षक पाठवण्यात आले होते. 558 शिक्षक तपासणीसाठी उपस्थित होते. तर 65शिक्षक गैरहजर होते. 381 शिक्षक तपासणीमध्ये पात्र ठरले असून 125 शिक्षक अपात्र ठरले आहेत. 52 शिक्षकांचे योग्य, अयोग्य पात्रता प्रलंबित ठेवण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे सादर केला असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT