accident file photo
सातारा

Satara accident: नानेगावजवळ भीषण अपघातात बापलेकीचा मृत्यू; चिमुकली गंभीर

दुचाकी आणि मोटारीची धडक होऊन झालेल्या अपघातात बापलेकीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली

पुढारी वृत्तसेवा

चाफळ : दुचाकी आणि मोटारीची धडक होऊन झालेल्या अपघातात बापलेकीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याच अपघातात सहा वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली असून, नानेगाव गावठाण परिसरात हा अपघात झाला. नितीन आत्माराम पाटील (वय 36) आणि शिवन्या नितीन पाटील (9, दोघेही रा. माजगाव, ता. पाटण) असे त्या दुर्दैवी बापलेकीचे नाव आहे. तर अवनी नितीन पाटील (वय 6) असे जखमी मुलीचे नाव आहे.

माजगाव येथील शेतकरी नितीन पाटील हे दोन मुलींना बरोबर घेऊन मोटारसायकलवरून उंब्रजला कामानिमित्त जात होते. दुचाकी नानेगाव गावठाणनजीक आली असता, उंब्रजकडून भरधाव मोटारीला दुचाकीची समोरासमोर धडक बसली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, नितीन यांची छोटी मुलगी शिवन्या पाटील ही जागीच ठार झाली होती. तर नितीन पाटील यांना कृष्णा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. तर अवनी पाटील ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार चालक वैभव निवास पाटील (रा. चाफळ) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT