डाॅ. स्मिता जाधव यांना छत्रपती शिवरायांची प्रतिमा भेट देताना खा.श्री. छ. उदयनराजे भोसले, शेजारी चित्रलेखा माने-कदम, सुनेशा शहा, तेजस्विनी घोरपडे, वैशाली भिलारे, तेजस्विनी दुर्गे, सुनील काटकर, काका धुमाळ व इतर. (छाया : देवराज कामाठी)  
सातारा

Udayanraje Bhosale : डॉ. स्मिता जाधव यांना दिलेली शाल विजयाची

खा. उदयनराजे : जाधवसाहेबांच्या योगदानाची पोचपावती सुनबाईंना विजयी करून द्या

पुढारी वृत्तसेवा

सातारा : डॉ. स्मिता जाधव यांचे सासरे पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव आणि माझे वडील हे जिवलग मित्र. मतदारांनी जाधवसाहेबांनी दिलेल्या योगदानाची पोचपावती त्यांच्या सुनबाईंना विजयी करून द्यावी. अफवांवर कुणीही विश्वास न ठेवता डॉ. स्मिताताईंना प्रचंड बहुमतांनी निवडून द्या, असे आवाहन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले.

विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदासंघाच्या भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव या सातारा जिल्हा दौर्‍यावर आहेत. त्यांनी शनिवारी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या 'जलमंदिर पॅलेस' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी जि. प.चे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, प्रतापगड विकास प्राधिकरण समिती सदस्य काका धुमाळ, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने-कदम, महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्या सुनेशा शहा, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तेजस्विनी घोरपडे, सातारा जिल्हा चिटणीस नितीन कदम, ॲड. विनित पाटील, सातारा शहर सरचिटणीस विक्रम बोराटे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अक्षय भोसले, सातारा शहर (बाह्य) अध्यक्ष वैशाली टंकसाळे, नगरसेविका रीना भणगे, वैशाली भिलारे, तेजस्विनी दुर्गे आदि प्रमुख उपस्थित होते.

डॉ. स्मिता जाधव या महायुतीच्या उमेदवार असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या भेटीबद्दल काय सांगाल, असे विचारले असता खा. उदयनराजे म्‍हणाले, माझे वडील आणि गडॉ. स्मिता जाधव यांचे सासरे पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधवसाहेब हे जिवलग मित्र. जाधवसाहेबांच्या योगदानाची पोचपावती त्यांच्या सुनबाईंना विजयी करून द्या.

शिक्षक मतदारसंघात सानप यांना सेनेच्या शिंदे गटाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, तो त्यांचा निर्णय आहे. मला त्यावर भाष्य करायचे नाही. मला जे योग्य वाटतं त्यावर मी ठाम आहे. यांनी काय सांगितलं हे ऐकायला मी मोकळा आहे का? वाट्टेल त्या परिस्थितीत मी अधिकृत दोन्ही उमेदवारांच्या पाठिशी आहे. कुणीही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन खा. उदयनराजे भोसले यांनी केले.

यावेळी सातारा पालिकेचे शहर नियोजन सभापती अशोक शेडगे, महिला व बालकल्याण समिती सभापती मोनिका घोरपडे, नगरसेवक मनोज शेंडे, सुधाकर यादव, विनोद मोरे, प्रशांत आहेरराव, सागर पावसे, पंकज चव्हाण, नगरसेविका सुजाता राजेमहाडिक, अपर्णा बाचल, शारदा वाघमोडे, विमल गोसावी, भारती शिंदे, वैशाली राजेभोसले, आशा डगळे, अनिता फरांदे, हेमलता भोसले, माजी सभापती सविता फाळके, माजी नगराध्यक्ष नासीर शेख, विजय बडेकर, माजी नगरसेवक किशोर पंडित, सागर भोसले आदि उपस्थित होते.

भाजपच्या दोन्ही उमेदवारांना साथ द्या...

पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिताताई जाधव आणि शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे हे दोनच आमचे अधिकृत उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवारांना मताधिक्क्याने निवडून देण्याची आपली जबाबदारी आहे. या उमेदवारांना निवडून आणण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. मी डॉ. स्मिताताईंना विजयाची शाल व बुके इन अ‍ॅडव्हान्समध्ये दिला आहे. मतदारांनी दोन्ही उमेदवारांना साथ द्यावी, असे आवाहन खा. उदयनराजे भोसले यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT