सातारा

Udayanraje Bhosale : खा. उदयनराजे भोसले यांच्याकडून कास जलवाहिनी कामाची पाहणी

सातार्‍याला मुबलक आणि शाश्‍वत पाणीपुरवठा करण्याच्यादृष्टीने महत्त्वाच्या ठरणार्‍या कास धरण वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी कामाची खा. उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातार्‍याला मुबलक आणि शाश्‍वत पाणीपुरवठा करण्याच्यादृष्टीने महत्त्वाच्या ठरणार्‍या कास धरण वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी कामाची खा. उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली. कास धरणाची उंची वाढवून तेथील पाणी सातारा शहरापर्यंत पोहोचवण्यासाठी उभारण्यात आलेल्या जलवाहिनीचे काम पूर्णत्वास आले असून लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे.

या प्रकल्पामुळे सातारा शहराला मुबलक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. भविष्यात चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीस चालना मिळणार आहे. शहराची वाढती पाण्याची मागणी लक्षात धेता हा प्रकल्प दूरदृष्टीचा आणि नागरिकांच्या हिताचा ठरणार आहे. यावेळी पॉवर हाऊस, सांबरवाडी व अनावळे येथे सुरू असलेल्या विविध कामांची प्रत्यक्ष त्याठिकाणी जाऊन पाहणी करून आढावा घेण्यात आला.

तसेच संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून कामाच्या प्रगतीची खा. उदयनराजे भोसले यांनी माहिती घेतली. सर्व कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी उपनगराध्यक्ष डी. जी. बनकर, पाणीपुरवठा अभियंता शहाजी वठारे, अभियंता दिग्वीजय गाढवे आदि उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT