Satara Crime News  File Photo
सातारा

Satara Crime: साताऱ्यात मोबाईल दुकानांवर धाडी

बनावट वस्तूंची विक्री : 4 व्यवसायिकांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : ॲपल या मोबाईल कंपनीच्या ॲक्सेसरीज विक्रीचा कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना नसताना त्यापैकी अनेक बनावट वस्तूंची विक्री होत असल्याने साताऱ्यात मोबाईल दुकानांवर कॉपीराईट या कायद्यांतर्गत धाडी टाकण्यात आल्या. साताऱ्यातील शाहू स्टेडियम व एसटी स्टॅन्ड परिसरात हा छापा टाकण्यात आला आहे. 19 लाख रुपयांच्या बनावट वस्तू सापडल्या असून 4 व्यवसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित अशोक बोरगे (वय 20, रा. खिंडवाडी ता.सातारा), अजित रघुनाथ साबळे (वय 33), दिनेश भगवानराम माळी (वय 40, सध्या रा.सदरबझार, सातारा. मूळ रा. राजस्थान), दिनेशकुमार चौधरी (वय 23, रा. शाहूपुरी, सातारा) या चार व्यवसायिकांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कुंदन गुलाबराव बेलोशे (वय 38, रा. कल्याण पूर्व, मुंबई) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ते कॉपीराईटचे अधिकारी आहेत.

ही कारवाई दि. 3 फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे. तक्रारदार कुंदन बेलोशे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, ॲपल या मोबाईल कंपनीच्या वस्तू विक्री करण्यासाठी अधिकृत परवाना दिला जातो. साताऱ्यात काही ठिकाणी असा परवाना नसताना अनेक वस्तूंच्या विक्री केल्या जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार तक्रारदार यांच्या पथकाने संशयित चार विक्रेत्यांच्या दुकानावर धाडी टाकल्या.

या कारवाईत चारही ठिकाणी ॲपल कंपनीचा परवाना नसतानाही ॲपलचे मोबाईल चार्जर, ॲडॉप्टर, चार्जर केबल, एअरपॉड, मोबाईल बँक कव्हर, मोबाईल बँक पॅनेल, बॅटरी, स्ट्रीप, कॅमेरा लेन्स अशा वस्तू होत्या. या सर्व वस्तू हुबेहूब ॲपल कंपनीच्या लोगो व रंगसंगती असलेल्या होत्या. याबाबतचा संशयितांकडे कॉपीराईटचा (स्वामित्व हक्क) कायदेशीर अधिकार नव्हता. हा सर्व मुद्देमाल 18 लाख 95 हजार 500 रुपयांचा होता. ॲपल या कंपनीच्या कॉपीराईटचे उल्लंघन केल्याने त्यांच्या विरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT