Mahesh Shinde 
सातारा

Mahesh Shinde | माजी आमदारांच्या 40 वर्षांतील भानगडी बाहेर काढणार : आ. महेश शिंदे

खेडच्या सरपंच फरांदेंवर झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागणार

पुढारी वृत्तसेवा

सातारा : खेड ग्रामपंचायतीमध्ये चांगले काम करणाऱ्या आमच्या पार्टीच्या सरपंचांना भ्रष्टाचाराच्या खोट्या प्रकरणात अडकवून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली आहे. याविरोधात योग्य यंत्रणेकडे दाद मागणार आहोत. खेड ग्रामपंचायतीवर 40 वर्षांची असलेली सत्ता उलथवून टाकल्यानेच माजी आमदारांना पोटशूळ उठला आहे.

इतकी वर्षे सत्ता देऊनही त्यांनी खेडची काय अवस्था करून ठेवली, हे माहीत आहे. त्यांनी कुठल्याही स्टेजवर यावे. आम्ही उत्तरे द्यायला तयार आहोत. मात्र, प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना बदनाम करू नका. अन्यथा तुमच्या काळातील भानगडी बाहेर काढाव्या लागतील, असा इशारा आ. महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

खेडच्या सरपंच अपात्रप्रकरणी विभागीय आयुक्तांनी जो निकाल दिला, त्याबाबत भूमिका मांडण्यासाठी आ. शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप शिंदे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT