सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून तिघांविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत सातारा तालुक्यातील एका गावात घडल्याची तक्रार पीडितेने दिली आहे.
तक्रारीनुसार, प्रतीक इंदलकर याने मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्याशी गैरवर्तन केले. समीर उमराणीकर यानेही तिच्याशी गैरवर्तन करून हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तसेच साईश पवार याने रूम दाखवण्याच्या बहाण्याने तिला नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रतीक इंदलकर याला अटक केली असून, समीर उमराणीकर व साईश पवार यांचा शोध सुरू आहे.