kidnapping Pudhari
सातारा

Minor girl kidnapping: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण; संशयिताला अटक

पाचगणी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत उलगडा करत संशयिताला अटक केली

पुढारी वृत्तसेवा

पाचगणी : पाचगणी येथील शाहूनगर परिसरातील 16 वर्षे 7 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याच्या प्रकरणाचा पाचगणी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत उलगडा करत संशयिताला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 21 एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास शाहूनगर येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. मुलीच्या वडिलांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती मिळून न आल्याने त्यांनी दि. 14 मे रोजी पाचगणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सपोनि दिलीप पवार, पोलिस उपनिरीक्षक बालाजी सोनुने व पोलिस हवालदार श्रीकांत कांबळे यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.

तपासादरम्यान संशयित विभास बाजीराव सुतार (वय 20, रा. वाळणे, ता. महाबळेश्वर) याने संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याची कल्पना असतानाही तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयिताला अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT