सातारा : सातारा-देगाव मार्गावर एमआयडीसी येथे शनिवारी सायंकाळी ट्रॅक्टर व दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात चिमुरडा ठार झाला. शिवांश अमर चव्हाण (वय 4, रा. कारंडवाडी, ता. सातारा) असे मृत झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे.
सातारा एमआयडीसी येथे ओकासा कंपनीसमोर हा भीषण अपघात झाला. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली. या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती. अपघातात चिमुरड्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.