देवापूर : म्हसवड येथील यश पेट्रोलपंपावरील सुमारे 4 लाख 11 हजार 279 रुपयांचा अपहार करुन पसार झालेल्या मॅनेंजरला म्हसवड पोलिसांनी जेरबंद केले. संशयिताला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.
रणजित नवनाथ सरगर (रा. दीडवाघवाडी, ता. माण, जि. सातारा) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसवड येथील यश पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम करणार्या रणजित सरगर याने दिवसभरात पेट्रोल पंपावर दिवसभरात जमा झालेल्या 4 लाख 11 हजार 279 रुपयांचा अपहार केला होता. याप्रकरणी जनरल मॅनेंजर दुर्गेश पांडुरंग शिंदे यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. रक्कमेचा अपहार करुन संशयित पसार झाला होता.
म्हसवड पोलिस संशयिताचा तपास करत होते. संशयिताच्या शोधार्थ मुंबई, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सपोनि अक्षय सोनवणे यांनी पोलिस पथके रवाना केली होती. परंतु हा संशयित पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताला सातारा व सोल्हापूर जिल्ह्याच्या सिमेवरुन अटक केली. संशयिताला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अक्षय सोनवणे, नीता पळे, भास्कर गोडसे, महावीर कोकरे, नवनाथ शिरकुळे, राहुल थोरात, वसीम मुलानी, सतीश जाधव, अभिजीत भादुले, दया माळी यांनी केली.