वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित 
सातारा

Satara News : वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित

कार्यालयीन वेळेत गैरव्यवस्थापन व नियमबाह्य कामांचा ठपका

पुढारी वृत्तसेवा

सातारा : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांना शासनाने निलंबित केले. त्यांच्या प्रशासकीय कार्यकाळात रुग्णालयातील गैरव्यवस्थापन, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी कठोर संवाद, तसेच कार्यालयीन वेळेबाहेर शस्त्र परवाना व वैद्यकीय प्रमाणपत्रांशी संबंधित प्रकरणे हाताळल्याच्या बाबी चौकशीत निदर्शनास आल्या आहेत. निलंबनाच्या कालावधीत डॉ. मदने यांचे मुख्यालय सोलापूर जिल्हा रुग्णालयात राहणार आहे.

वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनात कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्याशी बाहेरील व्यक्तींनी धक्काबुक्की व गैरवर्तन केल्याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. या प्रकरणासह चौकशी समितीच्या निष्कर्षांच्या आधारे रुग्णालय प्रशासनातील नियंत्रणाचा अभाव व गैरव्यवस्थापन स्पष्ट झाल्याचे आदेशात नमूद केले. जबाबदार वर्ग-१ राजपत्रित अधिकारी म्हणून डॉ. मदने यांचे वर्तन अशोभनीय असून, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील तरतुदींचा भंग झाल्याचे नमूद करत सक्षम प्राधिकाऱ्यांनी नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४ (१) (अ) अन्वये त्यांना आदेशाच्या दिनांकापासून पुढील आदेशापर्यंत निलंबित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT