Firing Pudhari
सातारा

Satara Crime: विद्युत मोटारीची वायर जोडली म्हणून झाडली गोळी

जमीन व विहिरीच्या वादातून धोंडेवाडी येथील प्रकार; सहा जणांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

कराड : विहिरीवरील विद्युत मोटारीची वायर जोडल्यावरून एकावर छऱ्याच्या बंदुकीतून गोळी झाडली. धोंडेवाडी (ता. कराड) येथे मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला .

जगन्नाथ रामचंद्र पाटील, भीमराव आबा खबाले, छाया जगन्नाथ पाटील, सुनंदा जालिंदर पाटील, रघुनाथ रामचंद्र पाटील, जयश्री रघुनाथ पाटील (सर्व रा. धोंडेवाडी) अशी गुन्हा नोंद झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत धनाजी पोपट पाटील (रा. धोंडेवाडी) यांनी पोलिसांत तक्रार दिली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, धनाजी पाटील व जगन्नाथ पाटील यांच्यात जमीन व विहिरीच्या संबंधावरून तीन वर्षांपासून कोर्टात दावा सुरू आहे. त्यातच मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास धनाजी पाटील विहिरीवर गेले असता मोटारीची वायर जोडली असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत तेथील सीसीटीव्हीमध्ये पाहिले असता जगन्नाथ पाटील यांनी ती वायर जोडल्याचा त्यांना संशय आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT