Molestation Case Pudhari
सातारा

Satara Crime: चिमुरडीसोबत गैरवर्तन; संशयिताला चोप

अवघ्या 9 वर्षांच्या मुलीचा विनयभंग करत तिच्यासोबत गैरवर्तन केल्यानंतर गंगराम बिरू वाबधने (वय 30) याला संतप्त जमावाने चोप दिला

पुढारी वृत्तसेवा

सातारा : अवघ्या 9 वर्षांच्या मुलीचा विनयभंग करत तिच्यासोबत गैरवर्तन केल्यानंतर गंगराम बिरू वाबधने (वय 30) याला संतप्त जमावाने चोप दिला. या घटनेमुळे साताऱ्यात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. संशयिताविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ही घटना दि. 13 मे रोजी सकाळी सातारा परिसरात घडली आहे. मुलगी घरी असल्याचे पाहून संशयिताने तिच्यासोबत गैरवर्तन केले. या घटनेने मुलगी घाबरली व तिने आरडाओरडा केला. कुटुंबीयांनी ही बाब पाहिल्यानंतर त्यांचा संताप झाला. मुलीसोबत गैरवर्तन झाल्याचे समोर आल्याने जमाव संतप्त बनला व संशयिताला चोप दिला.

या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जमावाला शांततेचे आवाहन केले. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. मुलीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संशयिताविरुद्ध ‌‘पोक्सो‌’चा गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT