सातारा

Satara liquor smuggling: प्‍लास्टिक सिरॅमिकच्या आड दारू वाहतूक

पावणेदोन कोटींचा मुद्देमाल जप्त; सातारा, कोल्‍हापूर एक्‍साईजची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

सातारा : लोणंद परिसरातून निघालेल्‍या ट्रकमधून दारूची बेकायदा होणारी वाहतूक राज्य उत्‍पादन शुल्‍क (एक्‍साईज) सातारा व कोल्‍हापूर विभागाने उघडकीस आणून सुमारे पावणेदोन कोटींचा मुद्देमाल जप्‍त केला. प्लास्टिक सिरॅमिक वाहतूक करत असल्‍याचे भासवल्‍याचे समोर आले आहे. याप्रकरणी एकाला अटक केली आहे.

शफिक रशिद शहा (वय ३९, रा. मध्य प्रदेश) असे अटक केलेल्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सातारा व कोल्‍हापूर एक्‍साईज विभागाच्या भरारी पथकाला २० जून रोजी गोपनीय माहिती मिळाली. सातारा-निरा रोडवर लोणंद (ता. खंडाळा) येथून १४ चाकी ट्रकमधून दारूची बेकायदेशीर वाहतूक होत आहे. त्‍यानुसार एक्‍साईज विभागाने सापळा लावला व ट्रक पकडला.

पथकाने ट्रकमध्ये पाहणी केली असता सुरुवातीला प्‍लास्टिक सिरॅमिकची १५० पोती होती; मात्र त्‍यामागे विदेशी मद्य पोलंड प्राईड व्हिस्कीचे १८० मि.ली.क्षमतेचे ८३४ बॉक्स तसेच रॉयल क्लासिक माल्ट व्हिस्कीचे १८० मि.ली. क्षमतेचे ६७२ बॉक्स असे १५०६ बॉक्स होते. राज्यात या दारूची किंमत १,७१,०४३२० रुपये होत आहे. या कारवाईत पथकाने ट्रकही ताब्यात घेतला असून एकूण २ कोटी ९४ हजार ३२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई कोल्‍हापूर एक्‍साईजचे उपआयुक्त विजय चिंचाळकर, सातारा एक्‍साईजचे अधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक्‍साईजचे अधिकारी किरण पवार, माधव चव्हाण, योगेश फटांगरे, अजय पाटील, विजय मरोड, कैलास छत्रे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT