सातारा

Satara Farmers Protest : क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर!

ओंड-उंडाळे दरम्यान ऊस वाहतूक रोखली; प्रतिटन पाच हजारांची मागणी, कारखानदारांच्या भूमिकेकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

उंडाळे : राज्यभरात उसाच्या दरावरून शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले असतानाच कराड दक्षिण विभागातही ऊसदर आंदोलनाची धग वाढू लागली आहे. प्रतिटन पाच हजार रुपये दर जाहीर करावा, या मागणीसाठी ऊसदर संघर्ष समितीच्या वतीने आज सकाळी दहा वाजल्यापासून ओंड-उंडाळे दरम्यान आंदोलन छेडण्यात आले. यावेळी उसाने भरलेली अनेक वाहने रोखून धरत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने कारखानदारांचे लक्ष वेधले.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने उसाला पाच हजार रुपये प्रतिटन दर मिळावा, अशी मागणी केली आहे. रयत सहकारी साखर कारखाना, कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि दालमिया शुगर या कारखान्यांनी अद्याप ऊसदराचा निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे २८ ऑक्टोबर साखर सम्राट कारखानदारांना रस्ता रोको करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार आज 30 ऑक्टोबर रोजी दूर संघर्ष समिती व शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्याकडे ऊस भरून जाणारे जाणारे ट्रॅक्टर रोखून धरण्यात आले होते. अखेर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा कारखाना व्यवस्थापनांना देण्यात आला होता.

मात्र, आंदोलनाचा इशारा देऊनही ऊस वाहतूक सुरूच असल्याने शुक्रवारी सकाळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्‍या कार्यकर्त्यांनी वाहने अडवली. या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव साळुंखे, ऊस दर संघर्ष समितीचे रयत क्रांती संघटनेचे विशाल पुस्तके बळीराजा शेतकरी संघटनेचे सुनील कोळी शेतकरी नेते दीपक पाटील तात्या पाटील यासह पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. ऊस दर संघर्ष समितीचे रयत क्रांती संघटनेचे विशाल पुस्तके बळीराजा शेतकरी संघटनेचे सुनील कोळी शेतकरी नेते दीपक पाटील तात्या पाटील यासह पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले.

यंदा पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला असून, ऊस उत्पादनावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाच हजार रुपये दर मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे. राज्यभरातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणमधील आंदोलनही तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT