टेंभुर्णी येथील अपघातात कोळकीतील दांपत्य ठार  
सातारा

Tembhurni Accident : टेंभुर्णी येथील अपघातात कोळकीतील दांपत्य ठार

कार-एसटी बसचा भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

फलटण : कोळकी, ता. फलटण येथील माजी ग्रामपंचायत सदस्य पती-पत्नी यांचा टेंभुर्णी येथे कार व एसटी बसच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातात अजून एका महिलेचा मृत्यू तसेच एक महिला गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे.

श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे कामगार नेते व कोळकी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काशिद व त्यांच्या पत्नी सौ. सुनीता बाळासाहेब काशिद (दोघेही रा. मूळ गाव गोखळी ता.फलटण व सध्या राहणार बुवासाहेबनगर कोळकी) हे टेंभुर्णी येथे लग्न सोहळ्यासाठी गेले होते. दरम्यान, त्यांच्या कारचा व एस टी बसचा समोरासमोर अपघात झाला. यामध्ये या दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दांपत्याच्या अपघाती मृत्यूने फलटण तालुक्यात शोककळा पसरली आहे. स्वराज कुस्ती केंद्राच्या माध्यमातून शेकडो पैलवान त्यांनी घडवले आहेत. बाळासाहेब काशीद वस्ताद म्हणून सर्व परिचित होते. संत वाङ्मय व धार्मिक ग्रंथांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या. अपघातग्रस्त दांपत्यावर गुरुवारी सकाळी कोळकी तालुका फलटण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT