Leopard attack Pudhari
सातारा

Kole Leopard Attack : कोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

रुग्णालयात उपचार दाखल

पुढारी वृत्तसेवा

ढेबेवाडी ः कोळे, ता. कराड येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला आहे. रविवार, दि. 26 रोजी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास चव्हाण मळा नावच्या शिवारात ही घटना घडली. जखमी शेतकऱ्याला उपचारासाठी त्वरित कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्रीरंग कृष्णत पाटील (वय 56, रा. कोळे, ता. कराड) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. श्रीरंग पाटील हे चव्हाण मळा नावच्या शिवारातील तळीच्या शेतात पिकांना पाणी पाजत होते. वाकून दारं धरत असताना साडेचारच्या सुमारास बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये बिबट्याची नखे पाटील यांच्या डोक्याला लागल्याने ते जखमी झाले आहेत. आरडाओरडा करून त्यांनी स्वतःचा बचाव केला. ग्रामस्थांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच कराड परिक्षेत्र वन विभागाच्या अधिकारी ललिता पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्वरित जखमींची भेट घेऊन विचासपूस केली. घटना घडलेल्या ठिकाणी सोमवारी पिंजरा लावण्यात येणार असल्याचे ललिता पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT