सातारा

Satara Illegal liquor: खटावमध्ये गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्व‌स्त

घटनास्थळावरील २२५ लीटर गुळमिश्रीत रसायनासह एक लाखाचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला

पुढारी वृत्तसेवा

खटाव : खटाव गावाच्या जवळ असलेल्या शिरसवस्ती लगत मळवी शिवारात सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर पुसेगाव पोलिसांनी गुरुवारी छापा टाकला. घटनास्थळावरील २२५ लीटर गुळमिश्रीत रसायनासह एक लाखाचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला. याप्रकरणी संशयित शरद संजय जाधव (वय ३०) याच्यावर पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिसांनी १० लिटर हातभट्टी दारू आणि २२५ लिटर गुळ मिश्रित नऊ प्लास्टिक बॅरल रसायन असे एक लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, पोलीस हवलदार विपुल भोसले, तात्यासाहेब ढोले, पोलिस कॉन्स्टेबल शंकर सुतार, दर्याबा नरळे, अविनाश घाडगे, होमगार्ड विजय बकरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

दरम्यान, पुसेगाव पोलिस ठाणे हद्दीत कोणी हातभट्टी दारू काढत असेल तर पोलीस प्रशासनाला नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करावे, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन सपोनि नागनाथ खुणे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT